Tarun Bharat

कुंडई सरकारी हायस्कूलच्या आवारात मॉबाईल टॉवर

Advertisements

पालक व ग्रामस्थांकडून जोरदार विरोध

प्रतिनिधी /फोंडा

कुंडई सरकारी हायस्कूलच्या आवारात उभारण्यात येणाऱया खासगी कंपनीच्या भ्रमणध्वनी मनोऱयाला पालक शिक्षक संघ व ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला आहे. शाळा, पालक तसेच कुंडई पंचायतीला विश्वासात न घेताच हा मनोरा उभारला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

येथील सरकारी हायस्कूलमध्ये गावातील बरीच मुले शिकत असून शाळेच्या इमारतीला लागूनच हा मनोरा उभारण्याचे काम सध्या सुरु आहे. हा मनोरा कार्यान्वित झाल्यानंतर त्यातून उठणाऱया रेडिएशनमुळे मुलांच्या तसेच आसपास राहणाऱया नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मनोरा उभारण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन, पालक व ग्रामस्थांना विश्वासात घेणे गरजेचे होते. शिवाय या भागात मोबाईल रेंज व्यवस्थीत मिळत असतानाही नवीन मनोरा व तोही शाळेला लागून का उभारला जात आहे ? असा प्रश्न येथील स्थानिक पंचसदस्य रुपेश कुंडईकर यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन मनोऱयाचे काम त्वरीत बंद करण्याचे आदेश संबंधीत खात्याला द्यावेत अशी मागणी कुंडईकर यांनी केली आहे. तसे लेखी निवेदनही संबंधीत खात्याला सादर करण्यात आले आहे.

Related Stories

शिरोडय़ात सुभाष शिरोडकरांची बाजी

Omkar B

मंत्री दीपक पाऊसकर यांचा वाढदिवस विशेष मुलांसोबत

Patil_p

कोठार्ली – सांगे परिसरात तणावपूर्ण शांतता

Amit Kulkarni

आजपासून मासेमारी बंदी

Omkar B

युतीसाठी काँग्रेसची तीन पक्षांकडे बोलणी

Amit Kulkarni

डिचोलीत 7 रोजी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नौकानयन स्पर्धा

Amit Kulkarni
error: Content is protected !!