Tarun Bharat

फिरत्या पशुचिकित्सालय वाहनांचा उद्या शुभारंभ

Advertisements

जिल्हय़ात धावणार 17 फिरती वाहने : जनावरांना मिळणार घरोघरी उपचार

प्रतिनिधी /बेळगाव

ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनावरांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंगोपनने फिरती पशुचिकित्सालये सुरू केली आहेत. या सेवेचा शुभारंभ मंगळवार दि. 19 रोजी होणार आहे. पशुसंगोपन मंत्री प्रभू चव्हाण यांच्या हस्ते फिरती पशुचिकित्सालय वाहनांचा शुभारंभ होणार आहे. एकूण सात जिल्हय़ांमध्ये 82 फिरती वाहने धावणार आहेत. यामध्ये बेळगावात 17, बागलकोट 13, धारवाड 8, कारवार 11, विजापूर 14, हावेरी 9, गदग 7 आदी ठिकाणी ही वाहने धावणार आहेत.

राज्यात एकूण 275 फिरती चिकित्सालये सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी 17 फिरती वाहने बेळगाव जिल्हय़ात धावणार आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील पशुपालकांच्या जनावरांनाही आता घरोघरी उपचार मिळणार आहेत. शिवाय जनावरांच्या आरोग्यासंबंधी तक्रारी तातडीने मार्गी लागणार आहेत. या फिरत्या पशुचिकित्सालय वाहनांच्या माध्यमातून गावोगावी फिरून जनावरांना आरोग्याच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. कृत्रिम गर्भधारणा, लसीकरण, औषधोपचार आणि इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत. जिल्हय़ात 28 लाख जनावरे आहेत. त्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या अगदी कमी आहे. त्यामुळे जनावरांना आरोग्याच्या सुविधा मिळणे अशक्मय बनले आहे. अशा परिस्थितीत ही फिरती पशुचिकित्सालये पशुपालकांना आधार ठरणार आहेत. दर एक लाख जनावरांमागे एक फिरते पशुचिकित्सालय वाहन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दवाखान्यापासून लांब असलेल्या आणि दुर्गम भागातील जनावरांनाही आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी 1962 हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. या हेल्पलाईनवर फोन केल्यानंतर जनावरांवर उपचार करण्यासाठी शेतकऱयांच्या दारापर्यंत पशुचिकित्सालय वाहन येणार आहे. त्यामुळे पशुपालकांच्या घरोघरी आता जनावरांना आरोग्य सुविधा मिळणार आहेत.

पशुपालकांनी लाभ घ्यावा…

या चिकित्सालय सुविधेचा लाभ घेण्यासाठी 1962 या टोल फ्री क्रमांकावर पशुपालकांनी कॉल करावा. या हेल्पलाईनवर कॉल केल्यानंतर उपचार करण्यासाठी शेतकऱयांच्या दरापर्यंत चिकित्सलय वाहन येणार आहे. या फिरत्या दवाखान्यामुळे जनावरांना सुविधा उपलब्ध होणार आहेत.

डॉ. राजीव कुलेर (उपसंचालक, पशुसंगोपन खाते) 

Related Stories

संरक्षक भिंत ग्रा. पं. सदस्याने दादागिरीने हटविली

Amit Kulkarni

रेल्वेमार्गाला शेतकऱयांचा का आहे विरोध?

Amit Kulkarni

होनगा औद्योगिक वसाहतीला हेस्कॉमकडून दुरुस्ती वाहन

Amit Kulkarni

एनआयएचे पुन्हा पीएफआय हस्तकांवर छापे

Patil_p

देव बोडगेश्वर जत्रेची सांगता

Patil_p

रोटरी क्लब ऑफ साऊथचा 32 वा वर्धापनदिन आज

Amit Kulkarni
error: Content is protected !!