वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मकर संक्रांतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थान आवारात गायींना चारा खाऊ घातला. पंतप्रधान मोदी मोठ्या प्रेमाने गायीला गूळ आणि गवत खाऊ घालत असल्याचे छायाचित्रांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये पंतप्रधानांच्या आजूबाजूला गायींचा कळप दिसत आहे.
केंद्रीय राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या निवासस्थानी आयोजित पोंगल उत्सवात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमात परफॉर्म करणाऱ्या मुलीला पंतप्रधान मोदींनी स्वत:ची शाल भेट दिली. कार्यक्रमात मुलीने सादरीकरण केल्यानंतर तिने पंतप्रधानांचे चरणस्पर्श करताच मोदींनी तिला बक्षीस म्हणून शाल दिली.