Tarun Bharat

“मोदी सरकार ब्रिटिशांप्रमाणे काम करतंय, अन्यायापुढे झुकणार नाही”; काँग्रेस नेत्यांचा संताप

ऑनलाईन टीम/तरुण भारत

ईडीने काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (soniya gandhi) आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (rahul gandhi) यांना समन्स बजावले आहे. ईडीने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात (national herald case) नोटीस पाठवली असून चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेते भाजपवर टीका करत आहेत. तर काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

ईडीनं सोनिया गांधी यांना ८ जून रोजी तर राहुल गांधी यांना २ जून रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी आणि रणदीप सुर्जेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचे नेते ईडीसमोर कधी हजर होतील याची माहिती दिली. राहुल आणि सोनिया गांधी हे दोघेही ८ जून रोजी हजर राहतील. सोनिया गांधी तर हजर होतीलच पण राहुल गांधी सध्या परदेशात आहेत. ते जेव्हा भारतात परततील तेव्हा त्यानुसार ईडी चौकशीची तारीख ठरवेल, अशी माहिती अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी ईडीची नोटीस मिळाल्यानंतर भाजपवर हल्लाबोल केला आहे. “नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र १९४२ मध्ये सुरू झाले. मग ब्रिटिश सरकारने ते चिरडण्याचा प्रयत्न केला. आज मोदी सरकारही तेच करत आहे. यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.

मनु सिंघवी (Abhishek Singhvi) यांनी सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. “हे प्रकरण ईडीने २०१५ मध्ये बंद केले होते. मात्र ही बाब सरकारला न आवडल्याने प्रकरण संपवणाऱ्या अधिकाऱ्यांनाच हटवण्यात आले. यानंतर नवीन अधिकारी आणून हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आले. देशातील महागाई आणि इतर समस्यांपासून लक्ष हटवण्यासाठी सरकार हे करत आहे. काँग्रेस राजकीय आणि कायदेशीर लढा देण्यास तयार आहे. अन्यायापुढे झुकणार नाही,” खंबीरपणे सामोरे जाणार असल्याचे संघवी यांनी सांगितले.

भाजपकडून सूडाचं राजकारण
नॅशनल हेरॉल्डचा मुद्दा वारंवार उपस्थित करुन भाजप स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करतंय. ज्यांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात काहीही सहभाग नाही. नॅशनल हेरॉल्ड हे वर्तमानपत्र १९४२ मध्ये सुरु झालं होतं. त्यावेळी ब्रिटिंशांनी त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश सरकारप्रमाणंच मोदी सरकारही काम करत आहे, अशा शब्दांत सुर्जेवाला यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ज्या प्रकरणात कुठलाच आर्थिक घोटाळा झालेला नाही त्याच आर्थिक गैरव्यवहाराची केस चालवण्यात येत आहे. याद्वारे भाजपकडून सूडाचं राजकारण, भीती आणि खालच्या दर्जाचं राजकारण करण्यात येत आहे, असा आरोपही काँग्रेस नेत्यांनी भाजवर केला आहे.

Related Stories

संयुक्त किसान मोर्चाची आज होणारी बैठक रद्द

datta jadhav

अमरावतीमध्ये कोरोनाचा पहिला बळी

prashant_c

बांगला देशच्या पंतप्रधान भारताच्या दौऱयावर

Patil_p

‘ईडब्ल्यूएस’ उत्पन्न मर्यादेवर फेरविचार

Amit Kulkarni

प्रियंका गांधींना UP पोलिसांनी घेतले ताब्यात

datta jadhav

फिलिपिन्स : कॅटॅन्डुआस बेटाला गोनी चक्रीवादळाचा तडाखा

datta jadhav