Tarun Bharat

पंतप्रधान म्हणून मोदीच लोकप्रिय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशाचे पंतप्रधान या नात्याने विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीच सर्वाधिक लोकप्रिय आहेत, असे सी-व्होटर या सर्वेक्षण संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. भाजपचा प्रभाव नसलेल्या पाच राज्यांमध्ये 2021 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्या राज्यांमध्ये हे सर्वेक्षण घेण्यात आले. मात्र, तेथेही बहुसंख्य लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदीच हवे आहेत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

2021 मध्ये आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी येथे विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. यापैकी आसाम वगळता कोणत्याही राज्यात भाजपला पाय रोवण्याइतकीही जागा नव्हती. पश्चिम बंगालमध्ये भाजपने चांगल्यापैकी प्रगती करून आपल्या जागा 3 वरून 77 पर्यंत नेल्या. तर आसाममध्ये मित्रपक्षांसह सलग दुसऱयांदा बहुमत मिळविले. पुदुचेरीतही त्यावेळी प्रथमच भाजप सत्तेत भागीदार बनला आहे. सर्वेक्षण करण्यासाठी या राज्यांची हेतुपुरस्सर निवड करण्यात आली होती. भाजपचा प्रभाव नसलेल्या राज्यात मोदींची लोकप्रियता किती आहे, हे पाहण्याचा उद्देश होता.

पंतप्रधान पदासाठी सर्वात सक्षम नेता कोण आहे? असा प्रश्न मतदारांना विचारण्यात आला होता. आसाममध्ये 43 टक्के मतदारांनी मोदींना तर 10.7 टक्के मतदारांनी राहुल गांधींना तसेच 11.62 टक्के मतदारांनी अरविंद केजरीवाल यांना कौल दिला. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदीच लोकप्रिय असल्याचे मत 42.37 टक्के मतदारांनी नोंदविले. सध्या पश्चिम बंगालची सत्ता तृणमूल काँग्रेसच्या हाती असून ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. तथापि, लोकसभेची निवडणूक झाल्यास त्यांना केवळ 26.8 लोकांची पसंती असेल. तर राहुल गांधींना 14.4 लोकांची पसंती असेल, असे दिसून आले आहे. पुदुचेरीत मोदींना 49.69 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. तर राहुल गांधींना केवळ 3.22 टक्के मतदारांची पसंती मिळाली आहे. काँग्रेसच्या अन्य नेत्यांसाठी हे प्रमाण 11.8 टक्के आहे. तामिळनाडूमध्ये मोदींची लोकप्रियता 29.56 टक्के इतकी कमी असली तरी राहुल गांधी त्याहीपेक्षा कमी म्हणजे 24.65 टक्के प्रमाणात लोकप्रिय आहेत. तर ममता बॅनर्जींना केवळ 5.23 टक्के पसंती आहे. केरळमध्येही मोदीच आघाडीवर असून त्यांना 30 टक्क्मयांहून अधिकांची पसंती आहे. या पाच राज्यांची सरासरी काढली असता मोदी 45 टक्के एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लोकप्रिय आहेत तर राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल त्यांच्यापेक्षा बरेच मागे असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

रेपो रेट जैसे थे!

datta jadhav

बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय

datta jadhav

कृष्णजन्मभूमी प्रकरणास न्यायालयाची अनुमती

Amit Kulkarni

483 जिल्हय़ांमध्ये 7,740 उपचार केंद्रे

Patil_p

माझा-दोआबामध्ये ‘आप’ची एंट्री, काँग्रेस अडचणीत

Patil_p

भाजपच्या बॅनरवरून अमित शहांचा फोटो गायब..?

Abhijeet Khandekar