Tarun Bharat

जागतिक शांततेसाठी मोदींच्या नावाचा प्रस्ताव

युद्ध रोखण्यासाठी आयोग स्थापन करावा : मेक्सिकोच्या अध्यक्षांची मागणी

वृत्तसंस्था /मेक्सिको सिटी

मेक्सिकोचे अध्यक्ष एंड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्रेडोर यांनी जगभरात युद्ध रोखण्यासाठी आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जगात शांततेला चालना देण्यासाठी स्थापन होणाऱया या आयोगात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पोप फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्रसंघ महासचि ऍण्टोनियो गुतेरेस यांना सामील करावे असे त्यांनी म्हटले आहे.

या आयोगाकरता संयुक्त राष्ट्रसंघात लेखी प्रस्ताव सादर करणार असल्याचे ओब्रेडोर यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे. जगभरातील युद्ध रोखण्यासाठी एक प्रस्ताव सादर करत किमान 5 वर्षांसाठी एक शांतता करार घडवून आणण्याचे या आयोगाचे लक्ष्य असेल असे त्यांचे म्हणणे आहे.

युद्ध संपविण्याचे आवाहन करत मेक्सिकोच्या अध्यक्षांनी चीन, रशिया आणि अमेरिकेला शांतता चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. तिन्ही देश आमचा हा प्रस्ताव स्वीकार करतील अशी अपेक्षा आहे. या देशांमधील परस्पर संघर्षामुळे एक वर्षापेक्षाही कमी कालावधीत जगाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. दारिद्रय़, महागाई वाढली असून जग अन्नसंकटाला तोंड देत आहे. तसेच संघर्षामूळे जगभरात अनेकांना जीव गमवावा लागला असल्याचे ओबेडोर यांनी म्हटले आहे.

ओबेडोर यांच्या प्रस्तावानुसार हा आयोग तैवान, इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्याप्रकरणी तडजोडीपर्यंत पोहोचण्यास मदत करणार आहे. यामुळे भविष्यात होणारा संघर्ष रोखण्यास मदत होणार असल्याचे त्यांचे मानणे आहे.

Related Stories

पाकिस्तान कंगाल झाल्याची इम्रान यांची कबुली

Patil_p

कॅस्ट्रो घराण्याचा राजकीय झंझावात विसावणार

datta jadhav

‘ही’ आहेत कोरोना संसर्गाची नवीन तीन लक्षणे

datta jadhav

स्वीडनमध्ये धार्मिक दंगली सुरूच

Patil_p

एकटाच पकडतो मगर

Patil_p

चेर्निहिव शहराची हल्ल्यात दुर्दशा

Patil_p