Tarun Bharat

मोदींच्या सूचनेचे फ्रान्सकडून कौतुक

Advertisements

फ्रान्सच्या अध्यक्षांनी संयुक्त राष्ट्रसंघात केला उल्लेख

वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ

अमेरिका आणि फ्रान्सने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे कौतुक केले आहे.  उझ्बेकिस्तानच्या समरकंद येथे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान मोदींनी केलेल्या वक्तव्यावरून हे कौतुक होत आहे. ‘सध्याचा काळ युद्धाचा नाही आणि यासंबंधी तुमच्याशी अनेकदा फोनवरून चर्चा केली आहे’ असे मोदींनी पुतीन यांना उद्देशून म्हटले हेते. युक्रेन युद्धावर पुतीन यांना सल्ला देण्यासह मोदींनी जगालाही संदेश दिला होता. रशिया-युक्रेन युद्धावरून मोदींनी अत्यंत सकारात्मकपणे भारताची भूमिका मांडली होती. यासंबंधी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी न्यूयॉर्क येथे सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघ महासभेदरम्यान पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत त्यांचा संदेश योग्य असल्याचे नमूद केले आहे.

हा काळ युद्धाचा नसल्याची मोदींनी मांडलेली भूमिका योग्य आहे. ही वेळ पाश्चिमात्य जगाचा सूड उगविण्याची किंवा पूर्व विरोधात पश्चिम असा विरोध करण्याची नाही. ही वेळ आमच्यासमोर असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्याची असल्याचे मॅक्रॉन म्हणाले.

अमेरिकेकडून मोदींच्या भूमिकेचे स्वागत

पुतीन यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेले विधान हे मूल्यांना धरून होते, त्यांचे हे विधान आम्ही योग्य मानतो आणि अमेरिका भारताच्या या भूमिकेचे स्वागत असल्याचे उद्गार अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी काढले आहेत.

पंतप्रधान मोदींनी मांडलेली भूमिका योग्य आणि न्यायोचित आहे. आता युक्रेनमधील युद्ध समाप्त होण्याची वेळ आहे. रशियाने संयुक्त राष्ट्रसंघ चार्टरच्या मूळ अटींचे पालन करत कब्जा केलेले भाग सोडून द्यावेत. कुणीच स्वतःच्या शेजारी देशाच्या क्षेत्रावर बळाने विजय मिळवू शकत नाही. रशियाने अशाप्रकारचा प्रयत्न सोडला तर युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित होण्यास वेग येईल असे सुलिवन म्हणाले.

Related Stories

वुहानमध्ये गेलेले 19 भारतीय संक्रमित

Omkar B

पुतीनविरोधी नवाल्नी यांना अडीच वर्षांची शिक्षा

Amit Kulkarni

दोन मिनिटांमध्ये झोप आणणारी युक्ती

Patil_p

चीनमध्ये 3 कोटी पुरुष अविवाहित

Patil_p

श्रीलंकेला दिली यंदा दीड लाख पर्यटकांनी भेट

Patil_p

इंग्लंडमध्ये पुन्हा वाढली कोरोना रुग्णसंख्या, चिंतेत शासन

Patil_p
error: Content is protected !!