मोहब्बते फेम अभिनेत्री लवकरच झळकणार
मोहब्बते, एलओसी कारगिल, व्हिक्टोरिया नं. 203 या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री प्रीति झांगियानी लवकरच ‘महापौर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे चित्रिकरण 10 मेपासून लखनौमध्ये सुरू होणार आहे.
प्रीति या चित्रपटातील भूमिकेसाठी लखनौमधील बोलीभाषा शिकत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश गुप्ता हे लखनौशी संबंधित असून त्यांच्या सूचनांमुळे मदत होणार आहे. महापौर चित्रपटातील माझी भूमिका सर्वसामान्य लोकांना आपलीशी वाटणारी आहे. राजकीय नेत्याची भूमिका मी साकारत असल्याचे प्रीतिने सांगितले आहे.
चित्रपटाचे चित्रिकरा 30 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. या चित्रपटात आतापर्यंत कधीच उपस्थित न झालेला मुद्दा मांडला जाणार आहे. भ्रष्टाचार कशाप्रकारे पर्यावरणाला नुकसान पोहोचवतेय या या चित्रपटातून दाखविले जाणार असल्याचे प्रीतिने म्हटले आहे. प्रीतिने मोहब्बते या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटसृष्टीत फारसे यश न मिळाल्याने मधल्या काळात ती मोठय़ा पडद्यावरून जणू गायबच झाली होती.