Tarun Bharat

मोहम्मद शमी वनडे मालिकेतून बाहेर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला दुखापत झाल्याने तो बांगलादेशविरुद्ध रविवारपासून सुरू होणाऱया वनडे मालिकेत खेळू शकणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या प्रवक्त्याने दिली आहे.

शमीच्या हाताला ही दुखापत झाली असून अद्याप ती पूर्णपणे बरी झालेली नाही. ऑस्ट्रेलियातून भारतात परतल्यानंतर सराव सत्रात गोलंदाजी करताना त्याला ही दुखापत झाली होती. सध्या भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱयावर आहे. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका आणि त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 14 डिसेंबरपासून चित्तगाँगमध्ये सुरू होईल. शमीची ही दुखापत किरकोळ स्वरुपाची नसल्याने त्याला कदाचित कसोटी मालिकेलाही मुकावे लागणार आहे. या आगामी वनडे मालिकेत भारतीय संघाला मोहम्मद शमीची उणीव निश्चितच जाणवेल. मोहम्मद शमीने 60 कसोटी सामन्यात 216 बळी मिळविले आहेत.

Related Stories

मेढा नगरपंचायतीच्या वतीने प्लास्टिक वापर बंदी करणेबाबत व्यापारी वर्गास सूचना

Patil_p

ऑस्ट्रेलियन महिला संघाची फायनलमध्ये धडक

Patil_p

विंडीजचा संघ मोठय़ा पराभवाच्या छायेत

Patil_p

जपानच्या विजयात ओनैवूची हॅट्ट्रिक

Patil_p

ऍलेक्स डी मिनॉर विजेता

Omkar B

हाशिम आमला निवृत्त

Amit Kulkarni