14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पाकिस्तानकडून अर्थसाहाय्याचे पुरावे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अल्ट न्यूज या संस्थेचा सहसंस्थापक मोहम्मद जुबेर याला दिल्ली पोलिसांनी प्रक्षोभक विधाने प्रसारित केल्याबद्दल आणि धर्मांध प्रचार केल्याबद्दल अटक केली असून दिल्लीतील न्यायालयाने त्याला जामीन नाकारला आहे. त्याची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयातही या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली असून दिल्ली पोलिसांना उत्तर देण्यासाठी चार आठवडय़ांचा अवधी देण्यात आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयानेही जुबेर याला जामीन देण्यास नकार दिला आहे.
जुबेर याला पाकिस्तान आणि सिरियाकडून अर्थसाहाय्य मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या बँक खात्यांचा तपास करता ही माहिती समोर आली. 2018 मध्ये जुबेरने एका हिंदू देवतेविषयी आक्षेपार्ह आणि घृणास्पद आशय प्रसिद्ध केला होता. त्यानंतरही त्याच्या वृत्तवाहिनीकडून अशा तऱहेच्या विकृत आशयाचे प्रसारण होत होते. यामुळे त्याला अटक करून विविध आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपपत्रात आता आणखी काही अनुच्छेद जोडण्यात आले आहेत.
या प्रकरणात अतुल श्रीवास्तव हे दिल्ली पोलिसांचे वकील असून जुबेरची बाजू वृंदा ग्रोव्हर या मांडत आहेत. महानगर दंडाधिकारी स्निग्धा सर्वारिया यांच्या न्यायालयात सुनावणी होत आहे. न्यायाधीशांनी प्रथमदर्शनी पुरावा असल्याचे नमूद करून जामीन नाकारला असून दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुनावणीवरही सरकार लक्ष ठेवून आहे. या प्रकरणी अन्य जणांना अटक होण्याचीही शक्मयता आहे.