बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी बेळगावला भेट दिली. त्यांनी वडगाव येथे संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक हरिभाऊ वझे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. हरिभाऊ गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे मोहन भागवत यांनी सर्वप्रथम त्यांची भेट घेतली. सायंकाळी शास्त्रीनगर येथील संघाच्या कार्यालयामध्ये झालेल्या संघ प्रार्थनेमध्ये ते सहभागी झाले. काही प्रमुख व ज्येष्ठ स्वयंसेवकांशी त्यांनी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. मात्र यावेळी झालेल्या बैठकीला माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आला. संध्याकाळी त्यांनी बाळाण्णा कग्गणगी यांचीही भेट घेतली. खडेबाजार येथील संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व जनकल्याण ट्रस्टचे सचिव सुधीर गाडगीळ यांच्याकडे भोजन करून ते हुबळीला रवाना झाले. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
Previous Articleलोककल्प फौंडेशनतर्फे मोतीबिंदू शस्त्रक्रिया
Next Article न्यू इंडियन क्राफ्ट एक्स्पोचा सदाशिवनगरात प्रारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.