Tarun Bharat

हलग्यात मोहरम सण भक्तिमय वातावरणात

Advertisements

गावात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक : दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम : मिरवणूक जल्लोषात : पारंपरिक वाद्यांचा गजर : मंगळवारी रात्री सांगता

वार्ताहर /किणये

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानला जाणारा हलगा गावातील मोहरम सण मोठय़ा उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त गावात दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता.

सोमवारपासून हलगा गावातील पवित्र मोहरमला सुरुवात झाली. गावापासून अर्धा कि. मी. अंतरावर दर्गा आहे. यामध्ये सोमवारी सकाळी भाविकांनी प्रसादासाठी मालेदा दिला. सायंकाळी मजनू खेळत गावातील पाच-सहा बैलगाडय़ा सजवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रत्येकाच्या घरातून एक-दोन लाकडे जमा करण्यात आली. सोमवारी दर्ग्याजवळ विधिवत पूजा करून आणलेली लाकडे इंगळय़ांसाठी वापरण्यात आली.

हिंदू-मुस्लीम एकात्मतेचे दर्शन

गावच्या मोहरमच्या माध्यमातून हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये एकात्मतेचे दर्शन घडले. मंगळवारी सकाळी सर्व जाती-धर्माच्या लोकांनी इंगळय़ांमधून पळून आपला नवस, व्रत केला. मंगळवारी सकाळपासून गावात देव मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मजनू खेळ रंगला होता. तरुण व बालचमू हातात पट्टा घेऊन पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य करत होते. ही मिरवणूक पाहण्यासाठी हलगा गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती.

मिरवणुकीचे प्रत्येक घरासमोर स्वागत करण्यात येत होते. संततधार पावसाची तमा न बाळगता भक्तांनी मिरवणूक उत्साहात काढली. यंदा अधिक महिना असल्यामुळे श्रावण मासामध्ये मोहरम आला असल्याची माहिती गावकऱयांनी दिली.

भक्तांची ग्रामस्थांकडून विशेष सोय

मंगळवारी सकाळपासूनच दर्गा परिसरात दर्शनासाठी भक्तांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी विशेष सोय केली होती. तालुक्याच्या विविध गावांमधून दिवसभर भाविक दर्शनासाठी येत होते.

सायंकाळी पुन्हा गावात मिरवणूक काढण्यात आली. रात्री अकरापर्यंत ही मिरवणूक सुरू होती. त्यानंतर गावाजवळील तलावाजवळ मिरवणूक येऊन मोहरम सोहळय़ाची सांगता झाली.

Related Stories

कोरोना बळींची मालिका सुरूच

Rohan_P

शहरातील नंदिनी दुधाची आस्थापने दिवसभर खुली

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारीपदी बसवराज नलतवाड यांची नियुक्ती

Amit Kulkarni

शाळा बंद…शाळा सुरू…

Amit Kulkarni

धामणे मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश-धान्य वाटप

Patil_p

डिसेंबर दुसऱया आठवडय़ापासून शाळा सुरू?

Patil_p
error: Content is protected !!