पुणे / वार्ताहर :
विश्रांतवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत राज भवार टोळीविरूद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर जीवे मारण्याचा प्रयत्न, मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार केलेली ही 111 वी कारवाई आहे.
राज रविंद्र भवार (वय 24, टोळी प्रमुख), जयेश उमेश भोसले (19 रा. धानोरी रोड, विश्रांतवाडी) सुमित सुभाष साळवे (19 रा. रामवाडी), गौरव सुनिल कदम (22 रा. धानोरी रोड, विश्रांतवाडी), अकबर आयुब शेख (21 रा. वडारवस्ती विश्रांतवाडी) यांच्यासह तीन अल्पवयीन आरोपींवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
अधिक वाचा : मुंबईत 2 जानेवारीपर्यंत जमावबंदी
सराईत राज भवार याने विश्रांतवाडी, येरवडा, विमानतळ परिसरात दहशत माजविली होती. या टोळीने खूनाचा प्रयत्न, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी एसीपी आरती बनसोडे, उपायुक्त शशिकांत बोराटे, अपर आयुक्त नामदेव चव्हाण यांच्यावतीने सादर केला. त्यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी भवार टोळीविरूद्ध मोक्का कारवाई केली. अधिक तपास एसीपी आरती बनसोडे करीत आहेत.