Tarun Bharat

अल्पवयीन तरूणीच्या विनयभंग प्रकरणी कोल्हापूरच्या पोलिसावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

प्रतिनिधी, कराड

Satara Crime News : एसटीतून प्रवास करत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलीस दलातील खेळाडू असलेल्या एका पोलिसावर कराड शहर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. महेश मारुती मगदूम गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, सदरचा गुन्हा सातारा ते कराड एसटीने प्रवास करताना बोरगाव हद्दीत घडल्यामुळे तपासासाठी बोरगाव पोलिसांकडे सोमवारी (ता. 17) रोजी रात्री वर्ग करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी महेश मगदूम हा कोल्हापूर पोलीस दलातील स्पोर्टमन आहे.तो कबड्डीपटू असून प्रो कबड्डी लीगमध्ये देखील त्याची निवड झालेली होती. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस दलाची मोठी नाचक्की झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. साताऱ्यात सुरू असलेल्या पोलीस क्रीडा स्पर्धेचा सोमवारी समारोप झाला. या स्पर्धेच्या निमित्ताने मगदूम हा सातारला आला होता. सातारवरून परतत असताना हा प्रकार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Related Stories

भारताकडून मैत्रीचे प्रयत्न होत असतानाच पाकिस्तानने खंजीर खुपसला

datta jadhav

दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचे वर्चस्व

Patil_p

बेअरस्टोच्या नाबाद शतकाने इंग्लंड सुस्थितीत

Patil_p

साताऱ्यातील म्हसवडकर एजन्सीसह देशात एकाच वेळी ६०० किसान समृद्धी केंद्रांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

Archana Banage

आमदार शिवेंद्रराजेंचे समर्थक वाईकर राष्ट्रवादीत

Archana Banage

कर्नाटकातून ऑक्सिजन आणण्यासाठी सातारा आगाराच्या एसटी चालकांची ड्रायव्हिंग

Archana Banage