सांगलीवाडी आणि कवठेपिरान येथील दोघांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी/सांगली
वीटभट्टीसाठी आवश्यक असलेले कामगार पुरा†वण्याची हमी देवून वीटभट्टी चालकाची सुमारे साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी प्रभाकर देवकुळे (वय 45, रा. सांगलीवाडी) आणि सतीश पाटील (वय 38, रा. कवठेपिरान ) या दोघांसह चौदा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधितांनी आपली फसवणुक केल्याची फिर्याद संजय बाळासो सिद ( रा. पारगाव, ता. हातकणंगले ) यांनी दिली आहे.
हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथील संजय सिद यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. त्यांना वीटभट्टीसाठी आवश्यक असणारे कामगार पुरविण्याची हमी देवून देवकुळे आणि पाटील या दोघांनी दिली होती. दहा ते कामगारांना उपस्थित ठेवून हेच कामगार तुम्हाला देण्यात येतील, असे सांगून संशयीत दोघांनी सुमारे साडेचार लाख रुपयांची रोकड घेतली आहे. दि. 2 जानेवारी 2021 रोजी दुसऱ्याच्या बँक खात्यावर रक्कम भरण्यास सांगितली. त्याप्रमाणे सिद यांनी पैसे त्या खात्यावर पैसे जमा केले. परंतु अद्यापपर्यंत संशयितानी एकही कामगार पुरविला नाही. वारंवार विनंती करुनही आपल्याला कामगार पुरा†वले जात नसल्याने सिद हे स्वत त्या दोघांकडे आले होते. त्यावेळी त्या दोघांनी आा†ण त्यांच्याबरोबरच्या कामगारांनी सिद यांना शिवीगाळ केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे सिद यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शहर पोलीसात देवकुळे, पाटील आा†ण दहा ते बारा कामगारांच्या ा†वरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.