Tarun Bharat

वधूसोबत नृत्यासाठी द्यावे लागात पैसे

Advertisements

पोशाखात पिन करून जोडतात चलनी नोट

जगात अनेक धर्म, समुदायांमध्ये विचित्र परंपरा पाळल्या जातात. सर्वात अनोख्या प्रथा विवाहसोहळय़ांमध्ये दिसून येतात. क्यूबा या देशात अशाचप्रकारची विचित्र प्रथा दिसून येते. क्यूबामध्ये विवाहसोहळय़ात वधू-वराला नृत्य करता येते. विवाहसोहळय़ात वधू-वर नृत्य करत असल्यास त्यांच्यासोबत नृत्य करण्याची इच्छा प्रत्येकाला होणे स्वाभाविक आहे, परंतु क्यूबामध्ये वधूसोबत नृत्य करणे सोपे नाही.

वधूसोबत नृत्य करायचे असल्यास तेथे याकरता पैसे द्यावे लागतात. नृत्यापूर्वी वधूच्या गाउनमध्ये नोट पिन करून जोडावी लागते आणि त्यानंतरच वधूसोबत नृत्य करता येते. विवाहासाठी मोठा खर्च येत असतो. अशा स्थितीत या प्रथेद्वारे लोक वधू-वराच्या विवाहाचा खर्च काही प्रमाणात उचलण्याचा प्रयत्न करतात.  तसेच या रकमेतून वधूला स्वतःच्या पतीसोबत फिरता येईल हा यामागचा उद्देश असतो.

क्यूबामध्ये विवाहाशी निगडित आणखी एक विचित्र प्रथा आहे. विवाहानंतर पाहुणे परतू लागतात, तेव्हा वधू-वर त्यांना आभारादाखल भेटवस्तू देत असतात. याला रिटर्न गिफ्ट समजले जाऊ शकते. सर्वसाधारणपणे या हँडमेड गिफ्ट्स असतात, ज्यावर रिबनद्वरो वधूवराचे नाव लिहिलेले असते. अनेकदा श्रीमतांच्या विवाहात पाहुण्यांना अधिक मूल्याची सिगार भेट केली जाते.

Related Stories

93 वर्षीय मेरीला मिळाला नवा जोडीदार

Patil_p

भारताशी लढण्याचे बळ नाही

Patil_p

तुर्कस्तानवर अमेरिकेचे निर्बंध

Patil_p

न्यूयॉर्कमध्ये अपार्टमेंटला आग, 19 जण मृत्युमुखी

Amit Kulkarni

म्यानमारमध्ये लष्कराकडून पुन्हा गोळीबार, 38 निदर्शकांचा मृत्यू

datta jadhav

इस्रायलमध्ये नाफ्ताली बेनेट यांचे सरकार स्थापन

Patil_p
error: Content is protected !!