Mumbai Crime News : मनी हाईस्ट वेबसीरिज पाहून आयसीआयसीआय बॅंकेत डल्ला मारणारा अखेर पोलीसांच्या ताब्यात सापडला. डोंबिवलीतील एमआयडीसी (Dombivli MIDC) भागात असलेल्या आयसीआयसीआय बॅंकेच्या (ICICI Bank) तिजोरीतून त्याने १२ कोटी रुपये लंपास केले होते. टोळीचा मुख्य सूत्रधार बँक कस्टोडियन अल्ताफ शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्यासोबत त्याची बहिण निलोफरला ही अटक करण्यात आले आहे. जुलै महिन्यात फरार झालेल्या या प्रमुखाला कोल्हापुरात पकडण्यात अखेर मानपाडा पोलिसांना यश आले. याआधी त्याच्या तिन साथीदारांना पोलीसांनी अटक केली होती.
दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी इसरार कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी या तिघांना अटक करत 5 कोटी 80 लाखांची रोकड जप्त केली होती .मात्र अल्ताफ शेख उर्वरित रक्कम घेऊन पसार झाला होता .अखेर या प्रकरणी पोलिसांनी तीन महिन्यांपासून चकवा देणाऱ्या अल्ताफ शेख याला कोल्हापूर येथून बेड्या ठोकल्या. अल्ताफने रोकड नवी मुंबई भागातील एका बंद इमारतीमध्ये लपवून ठेवली होती. आतापर्यंत नऊ कोटी रोकड हस्तगत करण्यात आली आहे. उर्वरित रोकड ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.
नेमके काय घडले
अल्ताफ शेख याने मनी हाईस्ट (Money Hiest) ही वेब सीरिज पाहून त्याला चोरीची कल्पना सुचली. त्याने झटपट श्रीमंत होण्याचा नादात स्वतः काम करत असलेल्या बँकेत चोरीचा प्लॅन आखला. ९ जुलैला सुट्टीच्या दिवशी बँकेचे अलार्म निष्क्रिय करत सर्व कॅमेऱ्यांच्या हार्ड डिस्क काढून त्याने तिजोरीतून ३४ कोटी रुपये लंपास केले. हे पैसे त्याने एसीच्या डक्टमधील छिद्रातून बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूस बांधलेल्या ताडपत्रीवर फेकून दिले. यानंतर बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर गहाळ असल्याची माहिती बँकेच्या वरिष्ठांना देऊन तिजोरीतील रक्कम तपासणी करण्याचे पथक बँकेत बोलावले. एकीकडे तपासणी सुरू असताना दुसरीकडे त्याने आपल्या कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी नावाच्या तीन मित्रांना बोलवून ३४ कोटींपैकी सुमारे १२ कोटी त्यांच्याकडे सोपवले. मात्र उरलेले पैसे त्याला घेता आले नाहीत. या दरोड्याचा गुंता सोडवण्यात अखेर मानपाडा पोलिसाना यश आले आहे.
Previous Articleदेशात 2026 पासून धावणार बुलेट ट्रेन
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.