Tarun Bharat

परिवहन मंत्र्यांना ईडीचा आदेश; पण परब साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. आज सकाळी 10 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले होते. मात्र, अनिल परब हे ईडी कार्यालयात हजर न होता त्यांनी थेट शिर्डीत साईबाबांच्या दरबारात हजेरी लावली आहे. आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आज ते ईडी चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली होती.

हेही वाचा-सुप्रिम कोर्टाला माजी न्यायाधीशांनी केले पत्राद्वारे आवाहन

अनिल परब हे साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला उपस्थित राहणार आहेत. अनिल परब यांचा दौरा हा पूर्वनियोजित होता असेही सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापा मारला होता. दरम्यान, अनिल परब आज चौकशीला उपस्थित राहणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, अनिल परब हे पूर्वनियोजित कार्यक्रमांनुसार आज मुंबई बाहेर होते. त्यामुळे ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहू शकणार नसल्याची माहिती त्यांच्या वकीलामार्फत अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती आहे.

हेही वाचा- मलिक-देशमुखांच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

नेमके प्रकरण काय आहे
मागील काही महिन्यांपासून अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहेत. काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानावर छापा मारला होता. त्याशिवाय अंधेरीतील शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरीदेखील छापा मारला होता. त्यावेळी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी जवळपास 12 तास ठाण मांडून होते. ईडीच्या छाप्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. दरम्यान आज परब चौकशीला हजर होणार का याची चर्चा सुरु होती. दरम्यान परब हे आज साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या वकीलांनी सांगितले.

Related Stories

पेट्रोल-डिझेलच्या दरात 15 दिवसांनंतर कपात

Amit Kulkarni

मोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची रालोआतून बाहेर पडण्याची घोषणा

Abhijeet Shinde

सदस्य नोंदणीत जिल्हा शिवसेना मागे का ?

Abhijeet Shinde

पीएम केअरच्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची चौकशी व्हावी – जयंत पाटील

Abhijeet Shinde

मुरलीधर मोहोळ यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना पत्र; केली ‘ही’ मागणी

Rohan_P

चिनी नागरिकांच्या भारत यात्रेवर निर्बंध

datta jadhav
error: Content is protected !!