सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाची तयारी
ऑनलाईन टीम/तरुण भारत
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) पावणे दोन महिन्यांपासून नवाब मलिक (nawab malik) ईडीच्या (ED) ताब्यात आहेत. १८ एप्रिलपर्यंत मलिक न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे अटकेविरोधात नवाब मलिकांनी सुनावणी घ्यावी यासाठी सर्वोच्च याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी करण्याची तयारीही सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) दर्शविली आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांच्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शवली आहे. मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दाखल केलेल्या याचिकेत नवाब मलिक यांनी न्यायालयाकडे तत्काळ सुटकेची मागणी केली आहे. नवाब मलिक यांच्यावतीने कपिल सिब्बल (kapil sibbal) यांनी न्यायालयाकडे या प्रकरणाची लवकर सुनावणी घ्यावी अशी मागणी केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना या प्रकरणातील कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असून, सुनावणीसाठी तयारी दर्शवली आहे. १८ एप्रिलपर्यंत मलिक न्यायालयीन कोठडीत आहेत. कोठडीतून सुटका होण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांनी सुरुवातीला ईडी कारवाईपासून दिलासा मिळावा आणि कोठडीतून सुटका व्हावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने त्यांना तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यावर मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या (mumbai high court) आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत, तातडीने सुटकेची मागणी केली. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने मलिकांच्या याचिकेवर सुनावणीसाठी सहमती दर्शवली आहे.