Tarun Bharat

राऊतांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भोंगा आता बंद झाला…

Advertisements

गोरेगाव इथल्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने काल अटक केली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. तर काही नेत्यांनाही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान बंडखोर नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ८ वाजताचा तो भोंगा आता बंद झाला अशा शब्दात टीका केली.(Money Laundering Case Sanjay Raut Arrest after CM Eknath Shinde Comment )

यावेळी बोलताना ते म्हणाले, ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला, ते आपापल्या कर्माने जातील’. येथून पुढे तो सकाळी आठ वाजताचा भोंगा वाजायचा बंद होणार आहे, अशा शब्दात निशाणा साधला. दरम्यान काल संजय राऊत यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी मोठा गराडा घातला होता. आज राऊत यांना ईडी कोर्टासमोर हजर करणार आहे. त्यामुळे ईडी राऊतांच्या कोठडीची मागणी करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. थोड्याच वेळात त्यांना जे.जे रुग्णालयात मेडिकलसाठी नेणार आहेत.

Related Stories

अरब देशांचे यान मंगळावर झेपावणार

datta jadhav

पोलिसांनी पोलिसांसाठी सुरू केल ‘कोव्हिड सेंटर’

Abhijeet Shinde

अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातूनच रसद

datta jadhav

देशात 18,177 नवे बाधित, 217 मृत्यू

datta jadhav

सातारा जिल्ह्यात ५६ जण पॉझिटिव्ह तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यु

Abhijeet Shinde

चिंता वाढली : देशात 9996 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P
error: Content is protected !!