Tarun Bharat

मंकीपॉक्सच्या धास्तीने विमानतळांवर सतर्कता

विषाणूचा जगातील अनेक देशांमध्ये प्रसार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळला नसला तरी त्याबाबत केंद्र सरकार सतर्क झाले आहे. त्यानुसार आफ्रिकन देशांतून येणाऱया प्रवाशांवर विमानतळावर लक्ष ठेवण्यात येत आहे. संशयित रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली जात असून गरज भासल्यास त्यांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये तपासणीसाठी पाठवले जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप या आजाराला महामारी घोषित केले नसले तरी हा एक संसर्गजन्य रोग असल्यामुळे सावधानता बाळगण्याची गरज आहे. मंकीपॉक्स कोरोना विषाणूपेक्षा खूपच वेगळा आहे. तसेच तो सध्या मोठय़ा प्रमाणावर पसरण्याची शक्मयता कमी आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने 11 देशांमध्ये मंकीपॉक्सची 80 प्रकरणे समोर आल्याची माहिती नुकतीच जारी केली आहे. लंडनमध्ये 5 मे रोजी मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर हा संसर्ग एकाच कुटुंबातील 3 लोकांना झाला होता. त्यानंतर आता हा संसर्ग 11 देशांमध्ये पसरला आहे. युरोप, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन आणि ब्रिटनमधील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचा विषाणू पसरला आहे. याशिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातही मंकीपॉक्सच्या रुग्णांनी चिंता वाढवली आहे. आता मंकीपॉक्सपासूनच्या सावधगिरीबाबत भारत सरकारने शुक्रवारी तातडीची बैठक घेतली. मंकीपॉक्सचा विषाणू सामान्यतः उंदीर आणि गिलहरी यांसारख्या प्राण्यांमध्ये आढळतो, त्याची बहुतेक प्रकरणे आफ्रिकन देशांतून नोंदवली जात आहेत.

Related Stories

आसाममध्ये 5.2 तीव्रतेचा भूकंप

Patil_p

2 हजार वायुसैनिकांची फील्ड डय़ुटीवर रवानगी

Patil_p

तिहार तुरुंगात कैद्याची आत्महत्या

Patil_p

इंधनाच्या उच्चांकी दरांमुळे शासनाच्या तिजोरीत मोठी भर

Patil_p

विनाअनुदानित सिलिंडर 19 रुपयांनी महागला

Patil_p

‘पराली’ करणार शेतकऱयांचे कल्याण

Patil_p
error: Content is protected !!