Tarun Bharat

केरळमध्ये वाढला मंकीपॉक्सचा धोका

Advertisements

संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूनंतर 20 जण क्वारंटाईन

तिरुअनंतपुरम / वृत्तसंस्था

केरळमधील त्रिशूरमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग पसरण्याचा धोका वाढला आहे. मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 20 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. शनिवारी मृत्यू झालेल्या रुग्णाचा मंकीपॉक्स अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सोमवारी वैद्यकीय अहवालाअंती स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसह थेट संपर्कात आलेल्या एकंदर 20 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मंकीपॉक्सबाधिताच्या मृत्यूनंतर त्रिशूरमधील पुन्नयुर गावातील पंचायत सदस्यांनीही एक बैठक घेत सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. या बैठकीमध्ये आरोग्य विभागाच्या सल्ल्याने सावधगिरीच्या उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. 30 जुलै रोजी मृत्यू झालेल्या 22 वषीय तरुणाला सोमवारी मंकीपॉक्सची लागण झाल्याची अधिकृत पुष्टी मिळाली. हा तरुण नुकताच संयुक्त अरब अमिरातीतून (युएई) परतला होता. त्याचा युएईतील अहवालही प्राप्त झाला आहे. 19 जुलै रोजी युएईमध्ये त्याचे नमुने घेण्यात आले होते. त्यानंतर 21 जुलै रोजी तो भारतात परतला होता. केरळमध्ये परतल्यानंतर मंकीपॉक्सच्या संशयाने 27 जुलै रोजी त्याला त्रिशूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर तरुणाचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सोमवारी त्याच्या नमुन्यांमध्ये संसर्ग झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Stories

प्रथम टप्प्यात 60 टक्क्यांहून अधिक मतदान

Amit Kulkarni

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये

datta jadhav

हिंदू दलित तरुणाच्या ऑनरकिलींगचे प्रकरण तापले

Patil_p

प्रकाशसिंह बादल यांनी सोडली सरकारी पेन्शन

Amit Kulkarni

बनावट कोविशिल्ड, टेस्टिंग किट बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 4 कोटींचे साहित्य जप्त

datta jadhav

जय महाराष्ट्र…!, मविआ सरकार कोसळले

Patil_p
error: Content is protected !!