Tarun Bharat

दुसऱ्या टप्प्यातील मान्सून सर्वसाधारण

पुणे / प्रतिनिधी :

देशभरात ऑगस्ट तसेच सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत नैऋत्य मोसमी पाऊस सर्वसाधारण राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात गोवा तसेच महाराष्ट्रात पाऊस कमी राहण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहोपात्रा यांनी मान्सूनचा ऑगस्ट व सप्टेंबर हा दुसऱ्या टप्प्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. ते म्हणाले, जून तसेच जुलै महिन्यात सरासरीच्या 8 टक्के अधिकचा पाऊस नोंद झाला आहे. जून महिन्यात पावसाची तूट राहिली असली, तरी जुलै महिन्यातील पावसाने ती भरून काढली आहे. जुलै महिन्यात 4 कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाली. त्याचा प्रभाव साधारण 21 दिवस राहिला. यामुळे अनेक भागात दमदार पाऊस झाला. जुलै महिन्यात पूर्व तसेच पूर्वोत्तर भारतात सरासरीच्या 45 टक्के कमी पाऊस झाला असून, तो मागच्या 122 वर्षांतील सर्वात नीचांकी झाला आहे. तसेच जुलै महिन्यात पश्चिम किनारपट्टीवर सर्वाधिक पावसाच्या नोंदी झाल्या आहेत.

ऑगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 94 ते 106 टक्के पावसाचा अंदाज आहे. या कालावधीत पश्चिम किनारपट्टीवर, छत्तीसगड, ओरिसा, मध्य प्रदेशचा काही भाग, बिहार व उत्तर प्रदेशचा काही भाग, लद्दाखचा बहुतांश भाग, सिक्कीम, केरळ तसेच पूर्वोत्तर भारताच्या काही भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा बहुतांश भाग, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशचा बहुतांश भाग दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, आंध्र किनारपट्टी, कर्नाटक तामिळनाडूच्या भागात पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहील.

ऑगस्टमध्ये महाराष्ट्र-गोव्यात पाऊस कमी

ऑगस्ट महिन्यात देशभरात सर्वसाधारण (96 ते 106 टक्क्यांदरम्यान) पाऊस राहणार आहे. पश्चिम किनारपट्टीचा बहुतांश भाग, महाराष्ट्र, गोव्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य भारताचा बहुतांश भाग, पूर्वोत्तर भारत, केरळात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील, तर राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गंगेच्या खोऱ्यात या महिन्यात पाऊस दमदार राहील. ऑगस्ट महिन्यात विदर्भातील कमाल तापमानही अधिक राहण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : MPSC कडून आता दोनच पूर्व परीक्षा

Related Stories

तेजस्वी यादव यांच्या पत्नीचे धर्मांतर

Patil_p

सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ

Archana Banage

प. बंगालमध्ये उद्यापासून अंशत: लॉकडाऊन

datta jadhav

संजदच्या अध्यक्षपदी ललन सिंग

Patil_p

कोरोना लढण्यासाठी गुगलचे खास डूडल

prashant_c

लसीकरण मोहीम संपताच ‘सीएए’ची अंमलबजावणी

Amit Kulkarni