Tarun Bharat

मान्सून केरळच्या उंबरठ्यावर

पुणे / प्रतिनिधी : 

नैऋत्य मोसमी वारे केरळच्या वेशीपाशी पोहोचले असून, येत्या 2 ते 3 दिवसांत मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने आज येथे वर्तवला आहे. 

मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून, गेल्या दोन दिवसांत त्याने तो पुढे सरकला आहे. शुक्रवारी दक्षिण अरबी समुद्र, संपूर्ण मालदीव, लक्षद्वीपचा आणि कॉमेरुनचा काही भाग त्याने व्यापला. 

दक्षिण अरबी समुद्रात पश्चिमी वाऱ्याची गती वाढली आहे. तसेच केरळ किनारपट्टी व दक्षिण अरबी समुद्रात ढगांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सून केरळात दाखल होण्याचे संकेत आहेत. अरबी समुद्र तसेच लक्षद्वीपचा आणखी काही भाग व्यापण्यास पोषक स्थिती आहे. दरम्यान, केरळात पुढील चार दिवसांत जोरदार पाऊस होणार आहे. 

Related Stories

दिल्लीत पिण्याचे पाणी, शौचालयाअभावी शेतकऱ्यांचे हाल

datta jadhav

परमबीर सिंग, तुम्ही लपलाय कुठे?

Amit Kulkarni

राम मंदिर बांधल्याने कोरोना बरा होणार का? : शरद पवार

Archana Banage

वडिलांचा मतदारसंघ, मुली रिंगणात

Patil_p

मिथेनॉलवर चालणार वाहने

Patil_p

अन्नधान्य निर्यातीसाठी मिळणार चालना..!

Rohit Salunke