ऑनलाईन टीम/तरुण भारत
मान्सूनच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. खरंतर, यंदा वेळेआधी मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. मात्र, आता मान्सून भारतात येण्यापूर्वीच त्याचा प्रवास संत झाल्याचं दिसत आहे. गुरुवारी पोषक वातावरणामुळे मान्सून पुढे सरकला आहे. २७ मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला होता. पण यासाठी उशीर होण्याची शक्यता आहे.
काय आहे मान्सूनची स्थिती?
पुढील ४८ तासांत दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण मालदीव आणि लक्षद्वीपच्या लगतचा भाग आणि कोमोरिन परिसरातील आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. तर “केरळमध्ये मान्सूनच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे”, IMD ने सांगितले.
उत्तर भारतातील विविध राज्ये व राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह गेल्या अनेक दिवसांपासून कडक उष्णतेमुळे जळत आहेत. गेल्या रविवारी दिल्लीतील कमाल तापमानाने ४९ अंशांचा टप्पा ओलांडला होता. कडक उन्हात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.(Monsoon Update)
राज्यांमधील पावसाची परिस्थिती काय असेल…
यूपी-बिहार, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. मात्र, याच दरम्यान देशात काही ठिकाणी मान्सूनने दणका दिला असून, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
-मान्सून नुकताच अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल झाला असून तो २७ मे रोजी केरळमध्ये पोहोचेल असा विश्वास आहे. मात्र हा अंदाज पुढे जाण्याची शक्यता आहे. तर हवामान खात्याने मान्सून कोणत्या राज्यात कधीपर्यंत पोहोचेल, याची माहितीही दिली आहे.
२० आणि २५ जूनपर्यंत गुजरातच्या बहुतांश भागात मान्सून पोहोचण्याची शक्यता वळविण्यात आली होती.३० जून रोजी राजस्थानच्या विविध भागात मान्सूनचा पाऊस पडेल. उत्तराखंडबद्दल बोलायचे झाले तर येथे २० जूनला मान्सून दाखल होईल. २५ जूनला मान्सून जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.
१० जून रोजी महाराष्ट्रात पोहोचेल. त्याच वेळी, १५ जून रोजी ते मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार इत्यादी राज्यांमध्ये पोहोचेल. त्याच वेळी, मान्सून २० जून रोजी उत्तर प्रदेशात दाखल होण्याची शक्यता आहे.ईशान्य भारतात विखुरलेला हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.
बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील ५ दिवसांत गडगडाटी वादळ/विजांचा कडकडाट/ सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
केरळ, माहे, लक्षद्वीपमध्ये गडगडाट/विजांच्या कडकडाटासह व्यापक हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पावसाची शक्यता आहे.
केरळ, माहे आणि उत्तर तमिळनाडू येथे २६ मे आणि २७ मे रोजी वेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
नैऋत्य राजस्थानमध्ये २८ मे आणि २९ मे २०२२ रोजी वेग वेगळ्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तविला आहे.