Tarun Bharat

पुढील ४८ तासात महाराष्ट्रात मुसळधार; हवामान खात्याचा इशारा

ऑनलाईन टीम/तरुण भारत

गेल्या आठ दिवसापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे नदी-नाले तुडूंब वाहू लागले आहेत. तर धरणक्षेत्रात पाण्यात वाढ होत आहे. यामुळे काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. याआधीच काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला होता. दरम्यान आज पुन्हा पुढील ४८ तासात महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, कोकण, पुणे, नाशिक या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांच्या काही भागात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. (Monsoon Weather Update)

आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, रायगडसह कोकणसह संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महत्वाच्या कामाव्यतरिक्त घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

धार्मिकतेतून विधायक समाजसेवा होणे गरजेचे : डॉ. विठ्ठल जाधव

Tousif Mujawar

मध्यप्रदेशात ‘कमळ’ फुलणार!

datta jadhav

राफेलची पहिली तुकडी 27 जुलैला भारतात दाखल होणार

datta jadhav

राधानगरी तालुक्यात ११९९ होम क्वारंटाईन मुक्त तर ५१२३ होमक्वारंटाईन

Archana Banage

मैत्रीदिन एकमेकांना शुभेच्छा देत साजरा

Patil_p

उरमोडी आवर्तनाचे पाणी पोहचले खटावमध्ये

Archana Banage