मोहनलाल यांचा चित्रपट
मल्याळी सुपरस्टार मोहनलाल यांचा चित्रपट ‘मॉन्स्टर’ 21 ऑक्टोबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. परंतु तत्पूर्वीच निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे. हा चित्रपट आखाती देशांमध्ये प्रदर्शित होणार नसल्याचे समजते. आखाती देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. चित्रपटात एलजीबीटीक्यूशी निगडित दृश्य असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मोहनलाल यांनी या इन्व्हेस्टिगेटिव्ह थ्रिलर धाटणीच्या चित्रपटात लकी सिंह ही भूमिका साकारली आहे. हा चित्रपट जगभरात हजारो स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. ‘मॉन्स्टर’च्या निर्मात्यांनी पुनर्परीक्षणासाठी हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे पाठविला होता. पुढील काळात बंदी हटल्यास हा चित्रपट आखाती देशांमध्ये प्रदर्शित होणार आह. उदय कृष्ण यांनी या चित्रपटाची कहाणी लिहिली आहे. लक्ष्मी मांचू, सिद्दीकी, लेना, हनी रोज, सुदैव नायर, केबी गणेश कुमार आणि जॉनी एंटोनी या चित्रपटात दिसून येणार आहेत.