2022 साठीचा अंदाज 7.7 टक्क्यांनी घटणार असल्याचे केले भाकीत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताची आर्थिक वृद्धीदर वर्ष 2022 मध्ये घटून 7.7 टक्क्यांवर राहणार असल्याचा अंदाज मूडीज इन्वेस्टर्स सर्व्हिस यांनी व्यक्त केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की व्याजदर, असमान मान्सून आणि मंदगतीने सुरु असणारी जागतिक पातळीवरील आर्थिक वृद्धीची गती या सर्व घडामोडीचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रवासावर परिणाम होणार असल्याची माहिती व्यक्त केली आहे.
या अगोदर मे महिन्यात मूडीजने 2022 साठी भारताचा आर्थिक वृद्धीदर 8.8 टक्क्यांवर राहणार असल्याचा अंदाज मांडला होता. अर्थव्यवस्था 2021 मध्ये 8.3 टक्क्यांच्या दराने वाढली होती, तर या अगोदर 2020 मध्ये कोरोनाच्या प्रभावामुळे हा दर 6.7 टक्क्यांवर राहिला असल्याची नोंद केली आहे. वर्ष 2022-23मध्ये प्राप्त झालेल्या जागतिक स्थितीमुळे मूडीजने म्हटले आहे, की भारताची केंद्रीय बँक चालू वर्षात आक्रमक कल प्राप्त करु शकते. यामुळे चलन नियंत्रणावर दबाव कमी करण्यासाठी बँक प्रयत्न करणार असल्याचे संकेतही नेंदवले आहेत.