Tarun Bharat

मूग डाळ सौंदर्य आणि आरोग्याचा खजिना, खाण्याचे आहेत 6 फायदे

Moong Dal Benefits : डाळींमध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात.ज्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो. डाळीचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये चणा डाळ, तुरडाळ, मसूर डाळ,मूग डाळ. मूग डाळ ही सर्वात आरोग्यदायी मानली जाते.यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रोटीन, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम असे अनेक जीवनसत्त्वे आढळतात. यामुळे अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. मुगाची डाळ तुम्ही अनेक पदार्थांमध्ये समाविष्ट करून खाऊ शकता.चला जाणून घेऊया मूग डाळ खाण्याचे काय फायदे आहेत.

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त

मूग डाळीमध्ये मॅग्नेशियम असते.त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही मूग डाळीचा आहारात समावेश करू शकता.

पाचन तंत्रासाठी उपयोग

मूग डाळीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात. जे अपचन आणि जळजळ होण्याच्या समस्येवर मात करण्यास मदत करतात. याच्या सेवनाने पचनशक्ती मजबूत होते.

हाडे मजबूत होण्यास मदत होते

मूग डाळीमध्ये भरपूर कॅल्शियम असते. याचे नियमित सेवन केल्याने हाडे निरोगी राहतात. फ्रॅक्चरची समस्या असल्यास आहारात मूग डाळ अवश्य समाविष्ट करा.

डोळे निरोगी ठेवण्यास मदत

मूग डाळीमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी5 आणि व्हिटॅमिन-बी6 आढळतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

केसांसाठी फायदेशीर

मुगाच्या डाळीमध्ये असलेले कॉपर केसांच्या मुळांना मजबूत करते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही केसांना मुगाच्या डाळीची पेस्ट लावू शकता. त्यामुळे केस दाट, लांब आणि चमकदार होऊ शकतात.

त्वचेसाठी उपयुक्त

मूग डाळ त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित वापराने त्वचेशी संबंधित समस्यांवर मात करता येते. रोजच्या आहारात मूग डाळीचे सेवन केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या,डाग कमी होण्यास मदत होते.

Disclaimer: लेखात दिलेल्या टिप्स आणि युक्त्या केवळ सामान्य माहितीच्या आधारावर आहेत. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Related Stories

व्हेरिकोज व्हेन्स

Omkar B

प्रसूतीनंतर वजन कमी करण्यासाठी ‘हे’ 6 उपाय करा, वजन आणि पोट सहज होईल कमी

Archana Banage

वाढतोय स्तनांचा कर्करोग

Amit Kulkarni

आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढे येऊन नावे नोंदवावीत

Archana Banage

फंगल इन्फेक्शन दूर करण्यास फॉलो करा ‘या’ टिप्स

Archana Banage

World Vegetarian Day : ‘या’ ६ शाकाहारी पदार्थात आहेत भरपूर प्रथिने,मांसाहाराला ही टाकतील मागे

Archana Banage