केंद्रीय मंत्री एस.पी सिंग बघेल यांचे प्रतिपादन, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह प्रकल्पाला दिली भेट
प्रतिनिधी/पेडणे
मोपा विमानतळ प्राकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार असून देश-विदेशातील करोडो पर्यटक हे दरवषी गोव्यात येतील. त्यामुळे येणाऱया काळात गोवा हे पर्यटन दृष्टय़ा मोठा प्रमाणात विकसित होईल, असे प्रतिपादन केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री एस. पी. सिंग बघेल यांनी मोपा विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन या प्राकल्पाच्या कामाची पहाणी केल्यानंतर ते पत्रकारांकडे बोलताना केले.
आग्राला लोक ताजमहाल पाहण्यासाठी येतात त्याप्रमाणे लोक देश-विदेशातून मोठय़ा संख्येने मोपा विमानतळ प्रकल्पामुळे गोव्यात येतील. देशातील मोठे प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज साकार होत आहेत. मोदींच्या भाजप सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने तसेच केंद्र सरकारने देशात राबविलेल्या योजना आणि प्रकल्प पाहण्यासाठी आपण गोव्यात आलो आहे. गोव्यातील उत्तर गोव्यात आयुर्वेदाचे केंद्र तसेच मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे गोव्याची वेगळी ओळख देशात होणार आहे. याचा फायदा हा पर्यटनदृष्टय़ा राज्याला होणार असून गोव्यातील जनतेसाठी हे दोन्ही प्रकल्प वरदान ठरणार आहे, असे मंत्री सिंग बघेल म्हणाले.
केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री एस. पी. सिंग बघेल, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी शुक्रवारी विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन धावपट्टी तसेच व्यवस्थापकीय कार्यालयाची पाहणी केली. यावेळी कंपनीचे सीईओ शेषन, विमानतळ प्राधिकरण शानभोगे, सरपंच भूषण नाईक, सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू : शेषन
15 ऑगस्ट रोजी या प्रकल्पावर पहिले उड्डाण करण्याची कंपनी आणि सरकारची इच्छा असून त्यादृष्टीने काम जोमात सुरू आहे. जगात विविध ठिकाणी आम्ही असे विमानतळ कंपनीने बांधले आहेत आणि गोव्यातही हा चांगला पीपीपी तत्त्वावर पहिला विमानतळ प्रकल्प उभारण्याचे काम कंपनीने हाती घेतली आहे. यातून मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे देश-विदेशातील पर्यटक पेडण्याच्या भूमित आणि मोपा विमानतळावर उतरणार आहेत, असे शेषन यांनी सांगितले.
नोकऱयात स्थानिकांना प्राधान्य : श्रीपाद नाईक
मोपा विमानतळ प्रकल्प आणि आयुष इस्पितळ प्रकल्पावर मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. या नोकऱयांमध्ये प्राधान्य क्रमाने पेडणे तालुक्मयातील बेरोजगार युवक-युवतींना प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यांनी या प्रकल्पाला जमिनी दिल्या त्यांनाही या प्रकल्पात नोकरीत सामावून घेण्याचा प्रयत्न असून त्यादृष्टीने तशा सूचना दिल्या आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला आठ वर्ष पूर्ण झाली असून केंद्र सरकारचे मंत्री भारत सरकारच्या वतीने गोव्यात उभारलेल्या प्रकल्पांची पाहणी करण्याच्या निमित्ताने आज आम्ही या प्रकल्पाला भेट दिल्याचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.
मंत्री बघेल दोन दिवस गोव्यात असून काल दक्षिण गोव्यात तर शुक्रवारी त्यांनी उत्तर गोव्यातील या दोन्ही प्रकल्पांना भेट दिली आहे. अशाच प्रकारचे केंद्रातील विविध मंत्री विविध राज्यात जाऊन केंद्र सरकारने उभारलेल्या प्रकल्पांना भेटी देऊन पाहणी केल्यानंतर बैठकीत त्याचा आढावा घेण्यात येणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.
पेडणेतील बेरोजगारीचा प्रश्न सुटेल : आर्लेकर
मोपा विमानतळ तसेच आयुष्य इस्पितळ प्रकल्पावर निर्माण होणाऱया नोकऱया स्थानिकांना प्राधान्य क्रमाने मिळायला पाहिजेत. त्यासाठी आपण कंपनीचे पदाधिकारी, मुख्यमंत्री यांच्याकडे चर्चा केली असून पेडणे मतदारासंघातील बेरोजगारीचा प्रश्न या दोन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून कमी होणार आहे, असे आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले.