राजापूर
राजापुरातील शिवबा प्रतिष्ठानच्यावतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘राजापूर श्री 2022’ जिल्हास्तर शरीरसौष्ठव स्पर्धेत एनएसजी फिटनेस चिपळूण व्यायामशाळेच्या समीर मोरे याने जिल्हास्तरावरील विजेतेपदाचा किताब पटकावला. तर तालुकास्तरावरील ‘राजापूर श्री 2022’ चा बहुमान आरएसपीएम राजापूर व्यायामशाळेच्या अजिंक्य कदम याने पटकावला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ही भव्य स्पर्धा पार पडली. यात जिल्हाभरातील व्यायामपटूंनी भाग घेतला होता. ही स्पर्धा जिल्हास्तरीय ‘राजापूर श्री 2022’ चार गटात खेळवण्यात आली. या 4 गटातून प्रत्येकी पाचजणांची निवड करण्यात आली. अंतिम स्पर्धेसाठी निवड झालेल्या 20 स्पर्धकांनी आपल्या शरीरसौष्ठवाचे शानदार प्रदर्शन केले. यामध्ये चिपळूण व्यायामशाळेच्या समीर मोरेने बाजी मारत राजापूर ‘राजापूर श्री 2022’ चा किताब पटकावला. तर या स्पर्धेतील ‘बेस्ट पोजर’ म्हणून फेक्स हार्डकोअर रत्नागिरी व्यायामशाळेच्या प्रणव कांबळी याची तर ‘उगवता तारा’ म्हणून आरएसपीएम राजापूर व्यायामशाळेच्या हर्षद मांडवकर याची निवड करण्यात आली. तर तालुकास्तरावर झालेल्या स्पर्धेत 3 गटात 14 स्पर्धक सहभागी झाले. त्यातून अजिंक्य कदमने बाजी मारत ‘राजापूर श्री 2022’ चा किताब पटकावला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, माजी नगराध्यक्ष ऍड.जमीर खलिफे, राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, माजी नगरसेवक सौरभ खडपे, प्रांताधिकारी कार्यालयाच्या नायब तहसीलदार दिपाली पंडित, सुशांत मराठे, रूपेश कांबळे, आफताब शेख, मनसेचे प्रकाश गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व आकर्षक चषक देवून सन्मानित करण्यात आले. स्पर्धेला प्रमुख पंच म्हणून शैलेश जाधव तर सहाय्यक पंच म्हणून विरेंद्र वणजु, दिनानाथ कोळवणकर यांनी काम पाहिले. स्पर्धा संचालन सदानंद जोशी व सुशांत पवार यांनी केले तर सूत्रसंचालन दिलीप कारेकर, जितेंद्र नाचणकर यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी शिवबा प्रतिष्ठानच्या संदेश आंबेकर, राजा खानविलकर, भूषण आरेकर, संदेश गुरव, सुरज पेडणेकर, दीपक चव्हाण, मंदार पेणकर, सुशांत पवार, मंदार बावधनकर, साईराम अमरे, डॉ. सुयोग परांजपे, हर्षद मांडवकर, राजीव राणे, सत्यवान लोळगे, सुनील पवार, संदीप चव्हाण, अविनाश तांबट, कृष्णा करंबेळकर, अक्षय पोकळे, प्रज्योत खडपे, नीलेश खानविलकर, स्वप्नील बाकाळकर यांसह शिवबा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.