Tarun Bharat

Ratnagiri; नोकरीचे आमिष दाखवून 160 हून अधिक महिलांची फसवणूक

Advertisements

खेड प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे प्रशिक्षणाच्या नावाखाली बेरोजगारांकडून लाखो रूपयांची रक्कम उकळल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा भामट्यांनी जिल्ह्यातील 160 हून अधिक महिलांची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे.

या प्रकरणी संजीवनी संजय शेलार (समर्थनगर, भरणे) यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या तकारीनुसार 5 लाख रूपयांना गंडा घातल्याचे म्हटले आहे. यात दापोलीतील एका महिलेचाही समावेश असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे. संजय पाटील, धनंजय घोले (रा. कोल्हापूर) या दोघांना येथील पोलिसांनी कणकवली येथून ताब्यात घेतले. भारत सरकारच्या ई-गव्हर्नन्स योजनेंतर्गत तालुकास्तरावर डाटा ऑपरेटर व तालुका समन्वयक म्हणून नोकरीला लावतो, असे आमिष दाखवत प्रत्येक महिलेकडून 3 हजाराची रक्कम उकळली. प्रशिक्षणाच्या नावाखाली 10 हजार रूपयेही उकळून त्यानंतर तालुकास्तरावर डाटा ऑपरेटर म्हणून नियुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र 3 महिन्यांचा कालावधी उलटूनही महिलांना नियुक्ती पत्रेच देण्यात आली नाहीत. या बाबत तगादा लावूनही ‘त्या’ दोघांनी चालढकलपणा केला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

असाच प्रकार यापुर्वी कणकवली येथेही उघडकीस आला होता. या प्रकरणाचे कनेक्शन खेड असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अखेर येथील पोलिसांनी कणकवली येथे जावून दोघांना ताब्यात घेतले. या दोघांची कसून चौकशी करण्यात येत आहे. फसवणूक झालेल्या महिलांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून कोणाकोणाची फसवणूक करण्यात आली? याचाही पोलीस कसून तपास करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशा जाधव अधिक तपास करत आहेत.

Related Stories

गुहागरातील 23 हॉटेल्स, रिसॉर्टना सीआरझेडचा दणका

Patil_p

एसटीतील निवृत्त अधिकारी एन.जी.कुलकर्णी यांचे निधन

NIKHIL_N

असनिये माजी सरपंच गजानन सावंत यांचे आकस्मित निधन

Ganeshprasad Gogate

कोरोना सेंटर, ऑक्सिजन आणि एम डी फिजिशियन देणार

Abhijeet Shinde

युवा रक्तदाता संघटनेने रक्ताच्या नात्यासह जोपासली सामाजिक बांधिलकी

NIKHIL_N

प्रभुंकडून रिफायनरीचे समर्थन

Patil_p
error: Content is protected !!