ऑस्ट्रेलियन ऍथलिटने मोडला विश्वविक्रम
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या वेबसाइटनुसार डेनियल स्कालीने 2021 मध्ये जाराड यंगने नोंदविलेला विक्रम (3,054 पुश-अप्स) मोडला आहे. डेनियल हा ऑस्ट्रेलियन ऍथलिट असून तो सीरपीएस या समस्येला तोंड देत होता, तरीही त्याने एप्रिलमध्ये स्वतःच्या दुसरा विश्वविक्रम (3,182 पुश-अप्स) नोंदविण्यास यश मिळविले आहे.
यापूर्वी देखील स्कालीने एब्डोमिनल प्लँक पोझिशनमध्ये सर्वाधिक काळाचा विश्वविक्रम केल्याचा दावा केला होता. ऑगस्ट 2021 मध्ये 9 तास 30 मिनिटे 1 सेकंदांपर्यंत स्काली या स्थितीला सांभाळण्यास पूर्णपणे सक्षम होता.
जगातील सर्वाधिक काळाचा प्लँक रिकॉर्ड होल्डर डेनियल स्कालीने एका तासात सर्वाधिक पुश-अप्सचा विक्रम केल्याचे म्हणत गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. विश्वविक्रमाचा प्रयत्न पूर्ण करण्यासाठी मला स्वतःची जीवनशैली बदलावी लागल्याचे स्कालीने म्हटले आहे.
वयाच्या 12 व्या वर्षी झालेल्या दुर्घटनेनंतर माझे जीवन अत्यंत कठिण ठरले होते. माझे शरीर अद्याप या दुर्घटनेच्या प्रभावाने पीडित आहे. सीआरपीएसमुळे कोमल स्पर्श, वेग, वारा किंवा पाणी यासारख्या गोष्टीचा स्पर्श कधीकधी मला वेदना देत असल्याचे त्याने म्हटले आहे.