Tarun Bharat

आफ्रिकेत फ्रेडी वादळाचे 400 हून अधिक बळी

पाऊस, भूस्खलनामुळे 88 हजार लोक बेघर

वृत्तसंस्था  / लिलोंग्वे (मलावी)

फ्रेडी चक्रीवादळामुळे मलावी, मोझांबिक आणि मादागास्कर या तीन आफ्रिकन देशांमध्ये 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे 700 लोक जखमी झाले आहेत. पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे सुमारे 88,000 लोक बेघर झाले आहेत. मलावीचे अध्यक्ष लाझारस चकवेरा यांनी देशात 14 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

चक्रीवादळग्रस्त भागात लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यातही अडचणी येत आहेत. चक्रीवादळ फ्रेडीने फेब्रुवारीमध्ये मलावीमध्ये प्रवेश केला होता. ते आता शांत झाले असले तरी आणखी काही दिवस मुसळधार पावसाची शक्मयता आहे. दुसरीकडे, मोझांबिकमध्ये भूस्खलनामुळे अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक भागात मोठी पडझड झाली असून बऱ्याच भागांचा संपर्कही तुटला आहे. या आपत्तीतून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी अजूनही सुरू असलेल्या पावसामुळे त्यात व्यत्यय येत आहे. मलावीचे अध्यक्ष लाझारस चकवेरा यांनी गुऊवारी क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये पूरग्रस्तांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी पूरग्रस्त भागाला विशेष अनुदानात्मक मदत देण्याची घोषणा केली आहे.

Related Stories

ब्रिटन पंतप्रधानांचा भारत दौरा दुसऱ्यांदा रद्द

Patil_p

पाकिस्तानात 50 वैमानिकांचे बनावट परवाने रद्द

datta jadhav

भारत आणि जपान संरक्षण सहकार्य वाढवणार

Amit Kulkarni

शस्त्रास्त्रखरेदीवर न्यूयॉर्क प्रांतात अंकुश

Patil_p

चीनच्या रोव्हरचे मंगळ ग्रहावर अवतरण

Patil_p

पुतीन यांची भाषणे लिहिणारा मोस्ट वाँटेड म्हणून घोषित

Patil_p