प्रतिनिधी /फातोर्डा
दक्षिण गोव्यातील एक अग्रगण्य पतसंस्था असलेल्या मडगाव स्कूल कॉम्पलॅक्स पेडीट कॉ-ऑपरेटीव्ह सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण आमसभा हल्लीच संस्थेचे चेअरमन बाबाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली फातोर्डा येथील रवींद्र भवनात झाली.
दक्षिण गोव्यातील प्राथमिक, शालेय, उच्च माध्यमिक आणि कॉलेजच्या शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱयांची ही अग्रगण्य संस्था असून 2021-22 या आर्थिक वर्षात या संस्थेला 50 लाखाहून अधिक निव्वळ नफा झाला असून पतसंस्थेने यावर्षी आपल्या सभासदांना 15 टक्के परतावा लाभांशद्वारे दिला आहे.
मडगाव स्कूल कॉम्पलॅक्स पेडीट कॉ-ऑपरेटीव्ह सोसायटीचे मुरगाव, सालसेत, काणकोण, केपे तालुक्यात 2000 हून अधिक सभासद असून काणकोण व मुरगावात पतसंस्थेचे विस्तारीत काऊंटर आहेत. यावेळी आमसभेला 300 च्या आसपास सभासद उपस्थित होते. यावेळी मडगाव स्कूल कॉम्पलॅक्स पेडीट कॉ-ऑपरेटीव्ह सोसायटीचे उपचेअरमन पीटर गोम्स, खजिनदार लॉरेन्सिया रिबेलो ई वाझ, डॉ. संजय सावंत देसाई, डॉ. गुणाजी देसाई, सरिता फर्नांडिस, तुळशीदास देसाई, मारुती देसाई व जोस परेरा यांची उपस्थिती होती.
यावेळी चेअरमन बाबाजी सावंत यांनी सर्व सभासद, मडगाव व पणजी सहकार कार्यालयातील अधिकाऱयांनी केलेले मार्गदर्शन आणि केलेले सहकार्य तसेच पतसंस्थेच्या कर्मचाऱयांचा वाटचालीत मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. यावेळी सावंत यांनी भागधारकांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. या आमसभेत मागील आमसभा आणि खास आमसभेच्या इतिवृत्तांना मान्यता मिळविण्यात आली. आगामी 2022-23 वर्षासाठी ऑडिटरच्या नियुक्तीला तसेच 2022-23 आर्था वर्षाच्या अंदाजपत्रकाला यावेळी आमसभेने मान्यता दिली.
2022-23 आर्थिक वर्षासाठी पतसंस्थेच्या खजिनदार लॉरेन्सिया रिबेलो ई वाझ यांनी अंदाजपत्रक सादर केले. तर शेवटी आभार संचालक तुळशीदास देसाई यांनी मानले. आमसभेत झालेल्या चर्चेत वैभव राऊत, नरेंद्रकुमार रिवणकर, ज्ञानेश्वर देसाई, देवेंद्र तुयेंकर, आत्मानंद पेडणेकर, राजेंद्र गावस, दिपाली रायकर, श्रद्धा पेडणेकर, नारायण नाईक, तन्मय प्रभू, आगुस्ता फर्नांडिस, विनो नाईक, पर्ल फालेरो, संदेश नागवेकर, नरेंद्र देसाई, बिट्टू गावकर, आयव्ही कॉनी दी कोसेसांव, आशा मास्कारेन्हस, ईश्वर केरकर, मौसिम सय्यद व मारियान बार्बोझा या सदस्यांनी भाग घेतला.