लाखो भाविकांकडून सढळ हस्ते दान
वार्ताहर : कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लमा देवीच्या मंदिरातील दानपेटी खोलण्यात आली. यंदा यल्लम्मा देवीच्या भक्तानी 1 कोटी 66 लाखाहून अधिक रकमेचे दान रेणुकाचरणी अर्पण केले आहे. या दानपेट्यातील रकमेची ईन पॅमेराद्वारे गेल्या दोन दिवसापासून भाविकांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात आली आहे. यासाठी यल्लमा मंदिराचे शासनाधिकारी, जिल्हाधिकारी व संबंधित देवस्थानचे कार्यनिर्वाहक अधिकारी एसबीपी महेश यानी रितसर अनुमती घेऊन दानपेटी खोलण्यात आली. या दानपेटीतील रक्कम, मौल्यवान दागिने मोजण्यात आले. दानपेटीत एकूण 1 कोटी 66 लाख रुपये व तेरा लाख किंमतीचे सोने, अडीच किलो चांदीची मोजणी नंतर करण्यात आली. गेल्या महिण्यात भाविकांनी हुंडीत दान केलेली रक्कम, सोने चांदीचे दागिने मोजण्याचे काम पूर्ण झाले आहे. देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसाय्या हिरेमठ मुजराई, खात्याचे बसराज जिरग्याळ, अरविंद माळगे आदी मान्यवर उपस्थित होते.