प्रतिनिधी /वास्को
म्हापशाचे आमदार तसेच गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जोशुआ डिसोजा यांनी अखेर मंगळवारी मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा ताबा स्विकारला. मंगळवारी ते वास्कोतील या प्राधिकरणाच्या कार्यालयात दाखल झाले असता भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
साधारण पंधरा दिवसांपूर्वी आमदार जोशुला डिसोजा यांची मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सरकारने निवड केली होती. मात्र, आमदारांनी या कार्यालयाचा ताबा घेतला नव्हता. अखेर ते दाखल झाल्याने मुरगावची पीडीए कुणाला हा विषय आता संपुष्टात आला आहे. मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाचे काम स्थानिक चारही आमदारांच्या सहकार्याने तसेच पंचाय क्षेत्रातील पंच व पालिका क्षेत्रातील नगरसेवक, कार्यालयीन कर्मचारी तसेच स्थानिक जनतेच्या सहकार्याने पूर्णपणे पारदर्शकरीत्या आणि कार्यक्षमरीत्या करीन असे आमदार जोशुआ डिसोजा यांनी म्हटले आहे.