Tarun Bharat

मोरजी ग्रामसभेतही विधवा महिलांना सन्मान मिळण्यासंबंधीचा ठरावमंजूर

प्रतिनिधी /मोरजी

कोरगाव व धारगळ ग्रामपंचायतीने यापूर्वीच विधवा महिलांना सन्मान मिळावा त्यासाठी तशा संबंधित असे ठराव मंजूर केल्यानंतर आता मोठय़ा महिलांच्या उपस्थितीत मोरजी पंचायतीने ही विधवा प्रथा रीतीरिवाज संबंधी विधवा महिलांना योग्य तो सन्मान मिळावा यासाठी ठराव मंजूर करण्यात आला.

   मोरजीची ग्रामपंचायतीची सभा श्री कळस देव मांगर मोरजी येथे आयोजित केली होती. सरपंच वैशाली शेटगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत विधवा महिला रितीरिवाज संबंधी ठराव मांडला आणि तो सर्वांनुमते मंजूर केला. यावेळी उपसरपंच अमित शेटगावकर, उपसरपंच अमित शेटगावकर, पंच पवन मोरजे, मुकेश गडेकर, तुषार शेटगावकर, संपदा शेटगावकर, प्रकाश शिरोडकर, सुप्रिया पोके आदी उपस्थित होते.

  या ठरावावर चर्चा करताना नयनी शेटगावकर यांनी विधवा प्रथाविरोधी ठरावाला सर्वानुमते मंजुरी द्यावी, असे आवाहन केल्यानंतर टाळय़ांच्या कडकडाटासह या ठरावाला मंजुरी दिली. जागृती युवक अमित मोर्जे यांनी, ठराव मांडून काही होत नाही परंतु प्रत्येकाची जर मानसिकता बदलली तर आपोआप कार्यवाही होऊ शकते असे ते म्हणाले.

 सरपंच वैशाली शेटगावकर यांनी, ज्या महिलांच्या आणि महिला सेल्फ ग्रुपच्या मनात हा विचार येऊन लेखी स्वरूपात ठराव दिलेला आहे त्या ठरावाची आम्ही योग्य पद्धतीने कार्यवाही करणार आहोत. त्यासाठी सर्व मोरजी वासियांनी आणि मोरजीतील महिला संघटनांनी पंचायत मंडळाला आणि प्रत्येक नागरिकांना सहकार्य करावे. ज्या महिलांनी हा ठराव मांडलेला आहे त्या महिलांचे आपण अभिनंदन करून अशा प्रकारचे ठराव इतर पंचायतीने घेऊन एखादा त्याविषयी जर कायदा केला तर कुठल्याच विधवा महिलेची यापुढे विडंबन किंवा अवमान होणार नाही असे मत सरपंच वैशाली शेटगावकर यांनी व्यक्त केले.

Related Stories

मनोहर पर्रिकरांच्या मुलाला आपची खुली ऑफर

Abhijeet Khandekar

राजीव गांधी यांनी गोव्याला राज्याचा दर्जा दिला

Amit Kulkarni

पणजीत पराभूत काँगेस उमेदवारांची बैठक

Amit Kulkarni

विजेचा ‘शॉक’ लागून लाईनमनचा मृत्यू

Amit Kulkarni

25 गोमंतकीय मराठी साहित्यिकांच्या व्याख्यानाचे ध्वनिचित्रमुद्रण

Amit Kulkarni

मोलेतील तिन्ही प्रकल्प गोव्याच्या हिताचे

Omkar B