वेळापत्रक जाहीर : प्रवाशांचे बुकिंग सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटकची राजधानी असणाऱया बेंगळूर शहराला बेळगावमधून सकाळच्या सत्रात विमानफेरी सुरू करावी, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली असून इंडिगो कंपनीने 30 ऑक्टोबरपासून विमानफेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी अशा दोन विमानफेऱया बेळगावमधून प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.
बेळगावमध्ये अनेक सरकारी कार्यालयांची उपायुक्त कार्यालये आहेत. त्यामुळे दररोज अनेक प्रशासकीय अधिकारी बेंगळूर-बेळगाव असा प्रवास करतात.
सध्या तरी हे अधिकारी सकाळच्या सत्रात विमान नसल्यामुळे खासगी बस अथवा रेल्वेने प्रवास करत आहेत. मागील वषी सकाळच्या सत्रात असणारी विमानफेरी काही तांत्रिक कारणाने स्पाईस जेटने रद्द केली होती. त्यामुळे सकाळी प्रवास करण्यासाठी विमान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्रवासी करीत होते.
इंडिगो कंपनीने सकाळच्या विमानफेरीचे वेळापत्रक जाहीर केले असून बुकिंगही केले जात आहे. सकाळी 9.15 वा. बेंगळूर येथून निघालेले विमान 1 तास 40 मिनिटांचा प्रवास करून 10.55 वा. बेळगावला पोहोचते. तर सकाळी 11.15 वा. निघालेले विमान 12.40 वा. बेंगळूरला पोहोचणार आहे. यामुळे सकाळी व सायंकाळी अशा दोन विमानफेऱया बेंगळूर-बेळगाव-बेंगळूर या प्रवासादरम्यान प्रवाशांसाठी उपलब्ध असतील.