Tarun Bharat

दुचाकीच्या धडकेत मॉर्निंग वॉकर्सचा मृत्यू

तिसऱ्या रेल्वेगेटजवळील घटना

बेळगाव : पहाटे फिरण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला दुचाकीने धडक दिल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. नागेंद्र भीमराव काकतकर (वय 52,  मूळचे रा. गुंडोळी-हल्ल्याळ, सध्या रा. मजगाव) असे त्यांचे नाव आहे. नागेंद्र हे एक उद्योजक आहेत. रोजच्याप्रमाणे ते मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. यामध्ये नागेंद्र हे गंभीर जखमी झाले. इतरांनी त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल केले. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.  या घटनेची माहिती दक्षिण रहदारी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेंद्र यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, मुलगी, जावई, असा परिवार आहे.

Related Stories

बॅडगी मिरचीचे भाव गगनाला

Patil_p

तानाजी गल्ली रेल्वेगेट अद्याप बंदच

Amit Kulkarni

युनिव्हर्सल ग्रुपवतीने कोरोना योद्धय़ांना पीपीई किट

Amit Kulkarni

दुर्गामाता दौडमध्ये हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग

Amit Kulkarni

मराठी साहित्यामध्ये स्त्री आत्मचरित्रांची मोठी भर

Amit Kulkarni

इनरव्हील क्लबचा अधिकारग्रहण समारंभ उत्साहात

Patil_p