Tarun Bharat

मोरोक्को-क्रोएशिया लढत गोलशून्य बरोबरीत

Advertisements

वृत्तसंस्था/ अल बायत, कतार

मागील विश्वचषक स्पर्धेतील उपविजेत्या क्रोएशियाला मोरोक्कोने जोरदार प्रतिकार केल्याने गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. गट फ मधील हा सामना अल बायत स्टेडियमवर झाला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.

क्रोएशियाला या सामन्यात अनेक संधी मिळाल्या. पण त्यांना त्याचा लाभ उठविता आला नाही. त्यांच्या देजान लवरेनचा एक प्रयत्न अगदी गोललाईनवरून क्लीअर करण्यात आला तर निकोला व्लासिकने अगदी जवळून मारलेला फटका मोरोक्कोचा गोलरक्षक यासिन बौनूने अप्रतिम बचाव करून वाया घालविला. क्रोएशियाचा कर्णधार लुका मोड्रिकला मागील वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता. पण या सामन्यात मोरोक्कोने त्याला रोखण्यात यश मिळविले. मोरोक्कोने उत्तम बचाव तर केलाच पण कडवा प्रतिकार करीत क्रोएशियन बचावफळीलाही दडपणाखाली आणले. दुसऱया सत्रात अश्रफ हकिमीने तर मोरोक्कोचा गोल नोंदवलाच होता. पण क्रोएशियन गोलरक्षक डॉमिनिक लिव्हाकोविचने दोन्ही मुठी आवळत पंच करून चेंडू बाहेर घालविल्यामुळे ते बचावले.

मोरोक्कोची प्रामुख्याने हकिम झियेचवर आक्रमणाची भिस्त होती आणि सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी फळीत तोच सर्वात धोकादायक वाटत होता. त्याने चांगली कामगिरी केली. पण त्याला फिनिशिंग टचची जोड मिळाली नाही. या सामन्यात तशी ऍक्शन कमीच पहावयास मिळाली. पण दोन्ही संघांकडून जोरदार खेळ मात्र पहावयास मिळाला. पूर्वार्ध कोराच गेला आणि उत्तरार्धात अखेरच्या टप्प्यात व्लासिकने एक शानदार प्रयत्न केला होता. पण मोरोक्कन गोलरक्षकाने त्यावर अप्रतिम बचाव केला. 80 व्या मिनिटाला क्रोएशियाच्या जोस्को ग्वार्डिओलचा हेडर वाईड गेल्याने त्यांची ही संधीही वाया गेली.

मागील वर्ल्ड कपमध्ये मोरोक्कोला गुणांचे खातेही खोलता आले नव्हते. पण यावेळी त्यांनी एक गुण खात्यात जमा केला आहे. येत्या रविवारी क्रोएशियाचा पुढील सामना कॅनडाविरुद्ध तर मोरोक्कोचा सामना बेल्जियविरुद्ध होणार आहे.

बुधवारचे निकाल

फ्रान्स विजयी वि. ऑस्ट्रेलिया 4-1

क्रोएशिया बरोबरी वि. मोरोक्को 0-0

आजचे सामने

1) स्वित्झर्लंड वि. कॅमेरून

वेळ ः दुपारी 3.30 वा.

2) उरुग्वे वि. दक्षिण कोरिया

वेळ ः सायं. 6.30 वा.

3) पोर्तुगाल वि. घाना

वेळ ः रात्री 9.30 वा.

4) ब्राझील वि. सर्बिया

वेळ ः मध्यरात्री 12.30 वा.

थेट प्रक्षेपण ः स्पोर्ट्स 18

लाईव्ह स्ट्रीमिंग ः जिओ सिनेमा.

Related Stories

इंग्लंड महिलांचा भारतावर मालिका विजय

Amit Kulkarni

राजस्थानच्या विजयाला नोबॉल वादाचे गालबोट!

Patil_p

स्पोर्ट्स mania

Amit Kulkarni

रशिद, रबाडा, लिव्हिंगस्टोन ‘एमआय केपटाऊन’ संघात

Amit Kulkarni

कोलकाता थंडरबोल्ट्स व्हॉलीबॉल लीग विजेता

Patil_p

मुंबई संघाचे नेतृत्व पृथ्वी शॉकडे

Patil_p
error: Content is protected !!