Tarun Bharat

ऑस्ट्रेलियन संघात मॉरिस, नेसरला स्थान

वृत्तसंस्था/ ऍडलेड

विंडीज विरुद्ध येथे होणाऱया दुसऱया क्रिकेट कसोटीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली. कर्णधार पॅट कमिन्सने या दुसऱया कसोटीसाठी नवोदित लान्स मॉरिस आणि मायकेल नेसर यांना संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे.

या कसोटी मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने मोठय़ा फरकाने जिंकून आघाडी मिळविली आहे. मायकेल नेसरने आपल्या अल्पशा क्रिकेट कारकीर्दीत गेल्या वषी ऍडलेड येथील दिवसरात्रीच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते. ऑस्ट्रेलियन गोलंदाजी अधिक भक्कम करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने मॉरिस आणि नेसर यांना संधी दिली आहे.

ऑस्ट्रेलियन संघ- कमिन्स (कर्णधार), बोलँड, कॅरे, ग्रीन, मार्कुस हॅरिस, हॅझलवूड, हेड, उस्मान ख्वाजा, लाबुशेन, लियॉन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि वॉर्नर, लान्स मॉरिस आणि मायकेल नेसर.

Related Stories

यू-17 महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आजपासून

Patil_p

तिसरा सामना जिंकून भारताची मालिकेत आघाडी

Patil_p

गरीबाच्या घरातच पैलवान तयार होतो

datta jadhav

अभिषेक सैनीला एकेरीचे जेतेपद

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 लढत आज

Patil_p

टी-20 विश्वचषक स्थानांची अदलाबदल करा

Patil_p