Tarun Bharat

आत्महत्या की घातपात ; बिळूरात आईसह तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

जत, प्रतिनिधी

Sangli Crime News : जत तालुक्यातील बिळूर येथील बेपत्ता असलेल्या आई व तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुनिता तुकाराम माळी (वय २७), अमृता तुकाराम माळी (वय १३), अंकिता तुकाराम माळी (वय १०), ऐश्वर्या तुकाराम माळी (वय ७) असे मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. ही घटना सोमवारी रात्री १ वाजता निदर्शनास आली. पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम चंद्रकांत माळी हे गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या सुतार फाटा जवळ राहतात. घराजवळच त्यांची शेती असून लगतच लिंगनूर तलाव आहे.

रविवारी सकाळपासून त्यांची पत्नी सुनीता व तिन मुली बेपत्ता होत्या. दिवसभर शोधाशोध करूनही चौघीही सापडल्या नाहीत.त्यांनी सासरवाडी कोहळी (ता.अथणी) येथेही विचारणा केली.त्यानंतर त्यांनी जत पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली.पोलिस,ग्रामस्थ व नातेवाईक यांनी शोधाशोध केल्यानंतर तलावात चौघींचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.सोमवारी रात्री एक वाजता चौघींचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.या घटने बद्दल बिळुर भागात उलट सुलट चर्चा सुरू होती.तपास जत पोलीस करत आहेत.

Related Stories

गाईला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा

Patil_p

कडेगाव गादी कारखान्यास लागली आग,सुमारे ४ लाखाचे नुकसान

Archana Banage

सांगली : पत्नीला मारहाण प्रकरणी माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

Archana Banage

अन्यथा ग्रामपंचायती समोरच गळफास घेतो; भिलवडीतील पूरग्रस्तांचा आक्रोश

Archana Banage

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; २० प्रमुख नेत्यांचा राजीनामा

Archana Banage

उत्तराखंड : देशातील भाविकांसाठी चारधाम यात्रा सुरू

Tousif Mujawar