Tarun Bharat

जन्मदात्या आईनेच घेतला पाच महिन्याच्या मुलाचा जीव

आधी गुदमरून मेल्याचा बनाव; मग फोन करून दिली स्वत:च कबुली

कुडाळ प्रतिनिधी

लोणंद तरडगाव ता. फलटण येथे जन्मदात्या आईनेच केला पाच महिन्याच्या चिमुकल्या मुलाचा ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक तोंड दाबुन खून केल्याच्या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे.

या बाबत लोणंद पोलीसाकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, पांढरी, तरडगाव ता. फलटण येथील सौ. आरती सोमनाथ गायकवाड या महिलेने लोणंद पोलीस स्टेशनला फोन केला, तिने स्वत:च्या पाच महिण्याच्या लहान बाळाला दि.12-4-2022 रोजी दुपारी 2 वाजता तोंड दाबून जिवे मारुन पुरले असल्याचे सांगितले आहे. फोनवर या महीलेने पोलिसांना “तुम्ही लगेच गाडी पाठवा, नाहीतर मी आणखी कोणाचातरी खुन करेन” असे सांगितले होते. त्यावरून पोलीसांनी घटनास्थळी जावुन खात्री केली असता तिने तिचा लहान मुलगा कार्तिक सोमनाथ गायकवाड, वय (5) महिने याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक तोंड दाबुन खुन केला असल्याचे सांगितले.

याची घटनेची माहिती लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी व सहकाऱ्यांसमवेत त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन माहीती घेउन सदर महिलेस ताब्यात घेतले. या प्रकरणी पो.कॉ. विठ्ठल काळे यांनी लोणंद पोलीसात फिर्याद दिली असुन महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खून प्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.

आरती गायकवाड या महिला संशयीत आरोपीला फलटण न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आज रविवार दि.24 रोजी सपोनि विशाल वायकर व सहकाऱ्यांनी सरकारी पंचासमवेत घटनास्थळाचा पंचनामा करून ज्या ठिकाणी चिमुकल्याचा मृतदेह पुरला होता. त्या ठिकाणी खोदण्यात आले असता मृतदेह मिळुन आला. या मृतदेहाचे पोस्ट मार्टम जागेवरच तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांनी केले. पुढील तपास सपोनि विशाल वायकर करीत आहेत.

Related Stories

ग्रूप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती चिंताजनक, परंतु स्थिर; वडिलांची माहिती

Archana Banage

सातारा : बोरगाव येथे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ६ शेळ्या ठार

Archana Banage

3 पोलीस कर्मचाऱयांची फ्रान्समध्ये हत्या, चौथा गंभीर

Omkar B

महाविद्यालये सुरू होण्याबाबत उच्च शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

Archana Banage

प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने डॉ. दाभोलकरांच्या हत्याऱ्यांना ओळखले

Abhijeet Khandekar

खंबाटकी बोगद्यात भीषण अपघात; 2 जागीच ठार, 5 जखमी

datta jadhav