Tarun Bharat

आरपीडी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा कार्यक्रम

प्रतिनिधी/ बेळगाव

एसकेई सोसायटीच्या आरपीडी कॉलेजमध्ये बीए, बीकॉम आणि बीबीएच्या प्रथम वर्षाच्या नूतन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. के. एम. गिरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. अनुजा नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

कॉलेजच्या स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष प्रा. प्रसन्ना जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्राचार्या डॉ. अनुजा नाईक यांनी कॉलेजचा गौरवशाली इतिहास व परंपरा तसेच कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱया सोयी-सुविधा याविषयी माहिती दिली. आयक्मयूएसी विभागाचे चेअरमन डॉ. अभय पाटील यांनी ‘मॅट’विषयी माहिती दिली. कॉमर्स विभागप्रमुख प्रा. एस. एस. शिंदे यांनी नवीन शिक्षण प्रणालीची माहिती दिली.

विद्यार्थी कल्याण अधिकारी व शिस्त पालन कमिटीचे चेअरमन प्रा. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर मर्यादित करावा, यासह शिस्तीच्या बाबतीत मार्गदर्शन केले. एनसीसी ऑफिसर डॉ. एम. एस. कुरणी, एनएसएस अधिकारी डॉ. रामकृष्ण एन., समाजशास्त्र विभागाचे चेअरमन डॉ. चंद्रशेखर मन्नोळी, परीक्षा कमिटी चेअरमन डॉ. सुभाष पाटील, रेंजर्स आणि रोस्टर्स विभागाचे डॉ. सुरेश चौगुला, प्रा. अजय हिरेमठ, डॉ. शर्मिला संभाजी, प्रा. इंदिरा होळकर, प्रा. लता कणबरकर, रेडक्रॉस विंगच्या डॉ. सुनंदा कितली यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. सविनय शिमनगौडर यांनी आभार मानले.  

Related Stories

पंजाब, तामिळनाडू, झारखंड, मध्यप्रदेश विजेते

Patil_p

एचएस प्रणॉयची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Amit Kulkarni

डेव्हिस चषक : जर्मनी उपांत्य फेरीत

Patil_p

माजी विजेता इंग्लंड महिला संघ उपांत्य फेरीत

Patil_p

बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर नाही ः द्रविड-गांगुली

Patil_p

महाराष्ट्र खो-खो संघटनेची मुख्यमंत्री निधीला देणगी

Patil_p