नवी दिल्ली
मोटोरोला यांनी आपला जी 42 हा नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. 14 हजार रुपयांपर्यंत असणाऱया स्मार्टफोनमध्ये अनेक वैशिष्टय़ांचा समावेश असणार आहे. पाण्याचा यावर कोणताही परिणाम होत नाही. ऑक्टाकोअर क्वालकॉम स्नॅपड्रगन 680 एसओसीवर हा फोन चालणारा असून ट्रिपल रियर कॅमेराही याला असेल. 20 डब्ल्यूची फास्ट चार्जिंगची सोय असून हा फोन रेडमी नोट 11, रियलमी 9 आय व पोको एम फोर प्रो यांच्याशी स्पर्धा करेल. 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 13 हजार 999 रुपये असणार असून अटलांटीक ग्रीन आणि मेटालिक रोज या रंगात येणार आहे. 11 जुलैपासून फ्लिपकार्टसह इतर रिटेल स्टोअर्सवर फोनची विक्री सुरू होणार आहे. सुरुवातीला फोनवर 1 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळणार असून यासाठी एसबीआय कार्डचा वापर गरजेचा असणार आहे.
इतर वैशिष्टय़े
?6.4 इंचाचा फुल एचडी प्लस डय़ुअल सीम
?डय़ुअल स्टीरीओ स्पीकर डॉल्बी ऑटमोससोबत
?मायक्रोएसडी कार्ड 1 टीबीपर्यंत स्टोरेज
?50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 मे. पि. अल्ट्रा-वाइट व 2 मे.पि. मॅक्रो शुटर, 16 मे. पि. सेल्फी कॅमेरा