Tarun Bharat

मोटो जी 73 लवकरच होणार लाँच

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मोटोरोला कंपनी आपल्या नवनव्या स्मार्टफोन्सच्या लाँचिंगवर भर देत असून येणाऱया काळामध्ये मोटोरोला आपला नवा मोटो जी 73 हा स्मार्टफोन भारतामध्ये लाँच करणार आहे. दरम्यान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सदरचा फोन हा येत्या 10 तारखेला लाँच होऊ शकतो. सदरच्या फोनची किंमत साधारणपणे 26 हजार रुपयांच्या घरात असू शकते, असे सांगितले जात आहे.

प्रसिद्ध केलेल्या एका टीझरमध्ये या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे. जी 73 हा 6.5 इंचाच्या आयपीएस एलसीडी डिस्प्लेसह येणार असून यात मीडियाटेक डायमनसिटी 930 चिपसेट असणार आहे. 8 जीबी रॅम व 256 जीबी अंतर्गत स्टोरेजसह हा फोन उपलब्ध केला जाणार असून 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा यात आहे. सदरचा फोन हा अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार असून हाताळण्यासाठी सुविधाजनक असणार असल्याचेही सांगितले जात आहे. बॅटरी ही 5000 एमएएच क्षमतेची असेल.

6.5 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले

5000 हजार एमएएचची दमदार बॅटरी

50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा

8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज

किंमत 26 हजार रुपयांच्या घरात

Related Stories

नोकियाचा परवडणारा स्मार्टफोन लॉन्च

Patil_p

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी मोठी बातमी : लवकरच येणार हे नवीन फीचर

Tousif Mujawar

मायक्रोसॉफ्टचे तेलंगणात मोठे डाटा केंद्र

Amit Kulkarni

भारतात ‘इनफिनिक्स हॉट 12 प्ले’ दाखल

Patil_p

‘ऍपल’च्या लेटेस्ट फोनची निर्मिती आता भारतात

Patil_p

गुगलचा अफोर्डेबल फोन पिक्सल 4 ए सादर

Patil_p