वारणानगर/प्रतिनिधी
सातवे ता. पन्हाळा येथील गावात प्रवेश करणाऱ्या पहिल्या वळणावर मोटर सायकल आणि मोपडची समोरा समोर धडक होऊन यामध्ये एकजण जागीच ठार झाला. यामध्ये राजाराम जनार्दन लठ्ठ (वय ५० रा. सातवे) हे मोपेडस्वार ठार झाले आहेत.
शनिवार दि. १६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राजाराम हे गावातून जनावरांना चारा घालण्यासाठी शेडकडे चालले होते. गावातील ४ स्त्यावरून ते कोडोली सैदापूर या प्रमुख जिल्हा मार्गावर प्रवेश करताना मोहरेकडे जाणाऱ्या मोटर सायकल व मोपेड स्वार लठ्ठ यांच्यात समोरा समोर धडक झाली. यामध्ये लठ्ठे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव झाला. यावेळी त्यांना तातडीने कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पीटल येथे उपचारास दाखल केले. परंतु तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाल्याने हा गुन्हा कोडोली पोलीसाकडे अद्याप तपासासाठी आलेला नाही. तर मोटर सायकलस्वार जखमी झाल्याचे समजते. मृत राजाराम लठ्ठे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. १८ रोजी सकाळी १० वा होणार आहे.