पोलिसांची कारवाई, सहा दुचाकी जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांत मोटारसायकली चोरणाऱया एका जोडगोळीला टिळकवाडी पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्यांच्याजवळून दीड लाख रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
बुधवारी अनगोळ येथील एका अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये उभी करण्यात आलेली मोटारसायकल चोरी झाली होती. याप्रकरणी संतोष यल्लाप्पा काकी यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा तपास करताना दोघा जणांना अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सहा मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.
गिरीश गिऱयाप्पा प्रभूनट्टी (वय 19, मूळचा रा. मेलमट्टी, ता. गोकाक, सध्या रा. झाडशहापूर), प्रभूपाद बाळकृष्ण चौगुले (वय 25, मूळचा रा. बसवणकुडची, सध्या रा. भाग्यनगर) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक संतोष दळवाई व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.