Tarun Bharat

Kolhapur; मिणचेत झाडाची फांदी पडून मोटारसायकलस्वार ठार, दोघे जखमी

पेठ वडगाव / प्रतिनिधी

पेठ वडगाव-हातकणंगले रस्त्यावर पेठ वडगावहून हातकणंगलेच्या दिशेने निघालेल्या ट्रकमध्ये असलेल्या मालाची रस्त्यावर आलेल्या झाडाच्या फांदीला धडक बसली. धडक बसल्याने फांदी तुटून अंगावर पडून गंभीर जखमी मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले. या अपघाताची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.

या बाबत पोलीसातून घेतलेली माहिती अशी की, पेठ वडगाव-हातकणंगले रस्त्यावरून हातकणंगलेच्या दिशेने मालवाहतूक करणारा ट्रक निघाला होता. दरम्यान मिणचे येथे रस्त्यावर आलेल्या झाडाच्या फांदीला ट्रकमधील माल घासून फांदी तुटून खाली पडली. ही फांदी पेठ वडगावच्या दिशेने निघालेल्या मोटरसायकलवर पडली.यामध्ये सचिन बाळासो चौगुले व हरिश्चंद्र बापू शिंदे (दोघे रा. बुवाचे वाठार, ता.हातकणंगले) हे मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले. तर याच झाडाच्या फांदीला पेठ वडगावकडे मोटारसायकलवरून येत असलेले सावर्डे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी शामराव मोरे यांच्या मोटारसायकलची धडक बसून गंभीर जखमी झाले. घटनास्थळी मिणचे ग्रामस्थांनी धाव घेवून रुग्णवाहिका व वडगाव पोलिसांना कळविण्यात आले.

दरम्यान डोक्यास व छातीवर मार लागून गंभीर जखमी सचिन बाळासो चौगुले याला उपचारासाठी कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात हलविले. दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. जखमी तानाजी मोरे यांच्यावर पेठ वडगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातस्थळी वडगाव पोलिसांनी धाव घेवून मिणचे ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरील फांदी हटवून वाहतूक सुरळीत केली. तर अपघात झाल्यानंतर न थांबता निघून गेलेल्या ट्रकची माहिती पोलिसांनी घेतली.

मयत सचिन चौगुले यांच्या मृत्यूने बुवाचे वाठार व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चौगुले यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. ते बुवाचे वाठार येथील श्री राम पाणी पुरवठा संस्थेमध्ये सचिव पदावर काम करत होते. अपघाताची नोंद वडगाव पोलिसात झाली असून ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

चंदगड नगरपंचायतीची प्लास्टिक बंदी अंतर्गत धडक कारवाई

Archana Banage

कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत सहा फुटाने वाढ

Archana Banage

उदगावात आठ वर्षाच्या बालकावर काळाचा घाला; मृतदेह बाहेर काढताचं कुटुंबियाचा आक्रोश हृदय पिळवटणारा

Abhijeet Khandekar

दीड वर्षांनी मार्केटची 1200 कोटींची भरारी !

Archana Banage

Sangli : कोसारी दुहेरी खून प्रकरणी आणखी तिघांना अटक; 24 तारखे पर्यंत पोलीस कोठडी

Abhijeet Khandekar

देवदर्शनासाठी जाणाऱ्या इंगळीतील कुटुंबाच्या गाडीला कर्नाटकात अपघात ; एक महिला ठार

Abhijeet Khandekar